शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

जाणून घ्या...का फेटाळली निमगावातील फेर मतदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 8:42 PM

निमगाव (टे) येथे फेर निवडणूक घेण्याची भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक—निंबाळकर यांनी केली होती मागणी.

ठळक मुद्दे उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रतिनिधिला दमदाटी करून हाकलून दिल्याची बाब समोर आलीयाबाबत तहसीलदार व वरष्ठि अधिकाºयांकडे चौकशी केल्यावर हरकत नसल्याचे स्पष्ट केले

सोलापूर : निमगाव (टे) येथे फेर निवडणूक घेण्याची भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक—निंबाळकर यांनी केलेली मागणी फेटाळून लावण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी लोकमतशी बोलताना दिली. 

माढा लोकसभेसाठी मंगळवारी मतदान झाले. माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे मतदान सुरू असताना भाजपचे मतदान प्रतिनिधी कैलास आलदार (रा. बादलेवाडी) यांना तेथील मतदान केंद्र अधिकाºयाने हाकलून दिले.  ही माहिती मिळताच प्रहारचे अतुल खुपसे प्रतिनिधीला घेऊन मतदान केंद्रावर आल्यावर तुझे इथे काय काम आहे असे म्हणून तेथील कार्यकर्त्यांनी प्रतिनिधीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत खुपसे यांनी  धैर्यशील मोहिते—पाटील यांना माहिती दिली. त्यामुळे ते तेथे आल्यावर त्यांना मतदान प्रतिनिधी आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली.  उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रतिनिधिला दमदाटी करून हाकलून दिल्याची बाब समोर आली. याबाबत तहसीलदार व वरष्ठि अधिकाºयांकडे चौकशी केल्यावर हरकत नसल्याचे स्पष्ट केले. 

भाजपच्या मतदान प्रतिनिधीला हाकलून दिल्याबद्दल उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते—पाटील यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी उमेदवार नाईक—निंबाळकर यांनी घडल्या प्रकाराबाबत निवडणून आयोगाकडे तक्रार करणार असून, निमगावात फेरनिवडणुकीची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापुरात निवडणूक निरीक्षक दाखल झाले. दिवसभर माण व खटाव विधानसभा मतदार संघातील मतपेट्या रामवाडी गोदामात आणण्याचे काम सुरू होते. सायंकाळी सर्व मतपेट्या दाखल झाल्यावर रामवाडी गोदाम सील करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाVotingमतदानElectionनिवडणूकRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर