शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

मडकी वस्ती येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST

जोडबसवान्ना चौकात महिलेला बेदम मारहाण सोलापूर : जोडबसवान्ना चौकातील नातेवाइकाच्या घरी कार्यक्रमानिमित्त आलेल्या महिलेस मानपानाच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत स्नेहा ...

जोडबसवान्ना चौकात महिलेला बेदम मारहाण

सोलापूर : जोडबसवान्ना चौकातील नातेवाइकाच्या घरी कार्यक्रमानिमित्त आलेल्या महिलेस मानपानाच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत स्नेहा रोहित आरकाल (वय २७, रा. पद्मानगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) जखमी झाली. ही मारहाण मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाली. स्नेहा आरकाल यांना त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे.

कंबर तलावात पडून तरुणाचा मृत्यू

सोलापूर : विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावमध्ये (कंबर तलाव) पडून आरिफ मुसा कुरेशी (वय २८, रा. शुक्रवार पेठ) या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला. आरिफ कुरेशी याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

दारूच्या नशेत स्वतःच्या गळ्यावर केला ब्लेडने वार

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे दारूच्या नशेत सोनू पांडुरंग देशमुख (वय ४०) या इसमाने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले. तो जखमी झाला. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. त्याला उपचारासाठी पत्नी सीमा देशमुख यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे.

मोहळमध्ये पतीने केला पत्नीवर गुप्तीने हल्ला

सोलापूर : मोहोळ येथील राहत्या घरी खरी माहिती पोलिसांना सांगितल्याच्या कारणावरून पती सनी देओल काळे याने पत्नीवर गुप्तीने केलेल्या हल्ल्यात, प्रियंका सनी देओल काळे (वय २८) ही महिला जखमी झाली. हा प्रकार बुधवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडला. प्रियंका काळे तिला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकी झाली आहे.

कुंभारी येथे वृद्ध इसमास बेदम मारहाण

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे राहत्या घराजवळ अज्ञात कारणावरून एकाने केलेल्या मारहाणीत मलकारी पुजारी-बने (६५) हा वृद्ध जखमी झाला. ही मारहाण मंगळवारी रात्री ८ वाजता झाली. मलकारी पुजारी-बने यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे.

दुचाकीवरून पडल्याने महिला जखमी

सोलापूर : वडिलांबरोबर दुचाकीने जात असताना घसरून झालेल्या अपघातामध्ये नागिनी अविनाश हजारे (वय २६, रा. गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर) जखमी झाल्या. हा अपघात बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला. नागिनी हजारे यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे.