महिलेची साडी ओढून असभ्य वर्तन; दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By विलास जळकोटकर | Published: January 13, 2024 04:28 PM2024-01-13T16:28:07+5:302024-01-13T16:28:43+5:30

अजित उल्लास वाघमोडे, सनी उल्लास वाघमोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

Indecent behavior by pulling on a woman's saree; A case of molestation against both | महिलेची साडी ओढून असभ्य वर्तन; दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

महिलेची साडी ओढून असभ्य वर्तन; दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

सोलापूर : ‘तू बांधकाम का काढले, इथे बांधकाम करु नको’ असे म्हणत ४० वर्षीय महिलेची साडी ओढून असभ्य वर्तन केल्याची तक्रार पिडितेने पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध जोडभावी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे. अजित उल्लास वाघमोडे, सनी उल्लास वाघमोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

फिर्यादित म्हटले आहे की, यातील पिडितेने राहत असलेल्या घराचे बांधकाम काढल्याने गुरुवारी ती बांधकामाच्या ठिकाणी थांबलेली होती. वरील आरोपी तेथे आले त्यांनी ‘बांधकाम का काढले, बांधकाम करु नको’ असे म्हणत पिडितेची साडी ओढून असभ्य वर्तन केले. शिवीगाळ करुन पिडितेला मारहाण केली. या मुळे पिडितेने जोडभावी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भा. द. वि. ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, तपास हवालदार जमादार करीत आहेत.

Web Title: Indecent behavior by pulling on a woman's saree; A case of molestation against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.