शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या वाढीव तुकड्या शासनाकडून नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:43 IST

सोलापूर जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांचा समावेश; राज्यात एकूण २३ तुकड्यांना परवानगी नाकारली

ठळक मुद्देउच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (बारावी) उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढलीसोलापूर विद्यापीठाने राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडे वाढीव तुकड्यांसाठी शिफारस केली होती

सोलापूर : शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने विशिष्ट विद्याशाखांच्या तुकड्यांना जलदगतीने मान्यता देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शिफारसी मागविल्या होत्या. महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता न केल्यामुळे विद्यापीठाने शिफारस केलेल्या पाच महाविद्यालयांच्या आठ तुकड्यांना शासनाने नामंजूर केले आहे. त्यामुळे आता वाढीव प्रवेशासाठी काय करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (बारावी) उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये जलदगतीने नवीन तुक ड्यांना मान्यता देण्याची तरदूत आहे. यानुसार सोलापूर विद्यापीठाने राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडे वाढीव तुकड्यांसाठी शिफारस केली होती. 

निकषांची पूर्तता न केल्याने मुंबई विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठ औरंगाबाद, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यासह सोलापूर विद्यापीठ अशा राज्यातील एकूण २३ तुकड्यांना शासनाने परवानगी नाकारली आहे. यात सोलापूर विद्यापीठाच्या पाच महाविद्यालयातील आठ तुकड्यांचा समावेश आहे.

वाढीव तुकड्या का नाकारल्या ?शासनाच्या नियमानुसार महाविद्यालयांनी निकष व कागदपत्रांची पूर्तता न केल्याने वाढीव तुकड्या नामंजूर करण्यात आल्या आहेत. इमारतीची प्रमाणित कागदपत्रे सादर न करणे, इमारतीचा प्रमाणित नकाशा तसेच छायाचित्र न जोडणे, संस्थेचे हमीपत्र, जमिनीची कागदपत्रे जोडली मात्र इमारतीची कागदपत्रे जोडली नाहीत तसेच आवश्यक इतर कागदपत्रे शासनाकडे जमा न केल्याने वाढीव तुकड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

या महाविद्यालयांच्या तुकड्या नामंजूर- संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संचलित, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर (एम. कॉम. आणि बी. एस्सी.), अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी सी. बी. खेडगी कॉलेज अक्कलकोट (बी. एस्सी. आणि बी. कॉम.), शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी (बी. कॉम.), श्रीराम शिक्षण संस्था, श्रीराम इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी पानीव (बी. एस्सी., ई.सी.एस. आणि बी.सी.ए.).

शासनाने वाढीव तुकड्या नामंजूर केल्याचे केणतेही पत्र अद्याप आम्हाला मिळालेले नाही. जर असे झाल्यास लवकरात लवकर शासनाने सांगितलेल्या अटींची पूर्तता करू. वाढीव तुकड्यांना शासनाकडून मान्यता मिळविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. - डॉ. एस. आय. पाटील, प्र. कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा