शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद डॉक्टरांना दिलेल्या शस्त्रक्रियेच्या परवानगीला आयएमएचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सीसीआयएम (सेंट्रल कौन्सिल ऑफ ...

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सीसीआयएम (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन)ने केलेल्या दाव्यानुसार या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकातील (अ‍ॅलोपॅथिक) नसून आयुर्वेदिक आहेत. अ‍ॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरू शकते, अशी भूमिका आयएमएतर्फे घेण्यात आली आहे.

सीसीआयएमने या सर्जिकल प्रक्रियेविषयीची सूचना मागे घ्यावी, मिक्सोपॅथी (मिश्रचिकित्सा पद्धती)ला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या समित्या बरखास्त कराव्यात, सरकारने सर्वप्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन द्यावे, या मागण्यांसाठी आयएमए आंदोलन करत आहे.

-------

कोविड आणि अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार

आयएमए सोलापूर शाखेतर्फे आठ डिसेंबर रोजी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. डफरिन चौक येथील कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. तसेच ११ डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ओपीडी बंद ठेवण्यात येणार असून, त्यानंतरच ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. बंददरम्यान कोविड आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरूच राहणार आहेत.

केंद्र सरकाने ५८ प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया करण्यास आयुर्वेद डॉक्टरांना परवानगी दिली आहे. या पद्धतीने परवानगी देणे चुकीचे आहे. मॉडर्न मेडिसिनच्या अंतर्गत ज्या शस्त्रक्रिया येतात त्या दुसऱ्या शाखेच्या डॉक्टरांनी करू नयेत. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

- डॉ. हरीश रायचूर, अध्यक्ष आयएमए, सोलापूर