तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको, असे म्हणत आमदारपुत्र रणजितसिंह शिंदेंना घेरावा

By दिपक दुपारगुडे | Published: March 2, 2024 06:51 PM2024-03-02T18:51:58+5:302024-03-02T18:52:13+5:30

गावातील मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन रणजितसिंह शिंदे यांना घेराव घातला.

If you have a Kunbi certificate, then we don't want it, surround Ranjit Singh Shinde, the MLA's son | तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको, असे म्हणत आमदारपुत्र रणजितसिंह शिंदेंना घेरावा

तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको, असे म्हणत आमदारपुत्र रणजितसिंह शिंदेंना घेरावा

सोलापूर: तुगंत (ता. पंढरपूर) येथे एका विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे आले होते. यावेळी गावातील मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन रणजितसिंह शिंदे यांना घेराव घातला. गावात नेत्यांना बंदी असताना तुम्ही गावात का आलात? तुम्हाला कुणबी दाखला आहे, मग आम्हाला नको का ? कुणबी दाखला असे म्हणत रणजितसिंह यांना आंदोलकांनी त्यांना गावातून बाहेर जाण्यास सांगितले.

तुम्ही मराठाला समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला नाही. विधानसभा सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भात एकही मुद्दा मांडला नाही. उलट जरांगे पाटील यांना आपण विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील यांना ५० हजार रुपये खर्चासाठी दिले म्हणून तुम्ही सांगता. समाजाने १ रुपया वर्गणी काढून तुमचे पैसे परत केले आहेत. यापुढे गावातील विकासकामांचे उद्घाटन तुम्ही करू नका? गावात येऊ नका? तुमचे वडील १५ वर्षे झाले आमदार आहेत. त्यांनी समाजासाठी एक काम केले सांगा? कधीही आवाज उठविला नाही. शिंदे कुटुंबाने कुणबी प्रमाणपत्र मिळविले. मग समाजातील इतर लोकांना मिळवून देण्यासाठी तुम्ही काय केले? तुमच्या फायद्यासाठी तुम्ही काहीही राजकीय निर्णय घेता. जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी सुरू झाली. याविरोधात आमदार बबनराव शिंदे बोलले नाहीत. यापुढे गावात यायचे असेल तर समाजाला विचारून या. असा इशारा मराठा आंदोलकांनी शिंदे यांना दिला आहे.

Web Title: If you have a Kunbi certificate, then we don't want it, surround Ranjit Singh Shinde, the MLA's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.