कलेक्टर कचेरीत आदर्श दास कसा मरून पडला? सोलापुरात चर्चा: नैसर्गिक मृत्यू की घातपात?

By रवींद्र देशमुख | Published: March 1, 2023 05:03 PM2023-03-01T17:03:42+5:302023-03-01T17:03:54+5:30

बुधवरचा दिवस उजाडला..लोक कामासाठी कलेक्टर कचेरीत आले. समजले की, एकाचा इथे मृतदेह आढळला.

How did Adarsh Das die in Collector Kacheri Discussion in Solapur Natural death or accident | कलेक्टर कचेरीत आदर्श दास कसा मरून पडला? सोलापुरात चर्चा: नैसर्गिक मृत्यू की घातपात?

कलेक्टर कचेरीत आदर्श दास कसा मरून पडला? सोलापुरात चर्चा: नैसर्गिक मृत्यू की घातपात?

googlenewsNext

सोलापूर :

बुधवरचा दिवस उजाडला..लोक कामासाठी कलेक्टर कचेरीत आले. समजले की, एकाचा इथे मृतदेह आढळला. रात्रीच प्रेत पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले..आदर्श राजू दास या 24 वर्षीय युवकाचा ती बॉडी असल्याचेही सांगण्यात आले..यावर चर्चा मात्र सुरू झाली..आदर्श कसा गेला? खून तर नाही ना?..आता पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

कचेरीतील दर्ग्याच्या परिसरात मंगळवारी मध्यरात्री म्हणे किरकोळ कारणावरून मृत आदर्शच्या आईचे व एका महिलेसोबत वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी आदर्श हा मध्यस्थी करत होता. त्याच दरम्यान, त्याला अचानक कोणाचातरी धक्का लागला. यातच तो खाली पडला. थोड्या वेळाने नातेवाईकांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी ही खबर पोलिसांना दिली. दरम्यान, घटनेची माहिती कळताच सदर बाझार पोलिस ठाण्याचे पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णसेवक लादेनच्या मदतीने त्याला रुग्णालयात आणले.

Web Title: How did Adarsh Das die in Collector Kacheri Discussion in Solapur Natural death or accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.