शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या बैठकीला खातेप्रमुखांची हजेरी

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

सीईओंचा आदेश: प्रश्न तत्काळ मार्गी लागण्यासाठी उपक्रम

सोलापूर: गावपातळीवर जिल्हा परिषद पातळीवरील कामे तत्काळ मार्गी लागण्यासाठी सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी नवा आदेश काढण्याच्या सूचना दिल्या. तालुका पातळीवरील ग्रामसेवकांच्या बैठकीला एका खातेप्रमुखाने उपस्थित राहण्याबाबतचे पत्र काढण्यास सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान होण्यासाठी चंद्रकांत गुडेवार सीईओपदाचा पदभार घेतल्यापासून नवनवीन सूचना देत आदेश काढण्यास सांगत आहेत. गुरुवारी त्यांनी ग्रामसेवक बैठकीला उपस्थित राहण्याबाबत आदेश काढण्याची सूचना दिली. ग्रामसेवकांच्या बैठकीत गटविकास अधिकारी व तालुका पातळीवरील अधिकारी कामाचा आढावा घेतात. या बैठकीला जिल्हा परिषदेचा खातेप्रमुख उपस्थित राहणार आहे. ग्रामसेवक व पंचायत समितीच्या कामातील अडचणी थेट सीईओपर्यंत पोहोचविण्यासाठी व जिल्हा परिषद पातळीवरील कामे मार्गी लागण्यासाठी या अधिकाऱ्यांची मदत होणार आहे. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ग्रामसेवकांच्या बैठकीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहावयाचे आहे. सीईओंनी दिलेल्या नव्या सूचना, शासनाची कामकाजाची पद्धत ग्रामसेवकांना सांगून त्यांच्या अडचणी व जि. प. पातळीवरच्या कामाची नोट तयार करुन सीईओंना सादर करावयाची आहे. याबाबतच्या सूचना गुरुवारी गुडेवार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांना दिल्या. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. -------------------------------ग्रामपंचायती व पंचायत समिती जिल्हा परिषदेला कामासाठी पत्र देते. ती कामे तत्काळ मार्गी लागण्यासाठी ग्रामसेवकांच्या बैठकीला गेलेल्या अधिकाऱ्यांनी नोट्स तयार करून सीईओंना द्यावयाची आहे. -चंद्रकांत गुडेवार-जि. प. सीईओ (प्रभारी)