महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:28 IST2025-12-01T09:07:28+5:302025-12-01T09:28:03+5:30
सांगोल्यात शिवसेनेचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने धाड टाकली.

महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. आज प्रचारसभा थंडावणार आहेत. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्षच एकमेकांविरोधात निवडणूक लढत असल्याचे दिसत आहे. सांगोल्यात महायुतीमधील वाद वाढत असल्याचे दिसत आहे.
रविवारी (३० नोव्हेंबर) रात्री सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला आहे. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतली. यावेळी शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
सांगोल्यात भाजपा, शेकाप आणि माजील आमदार दीपक साळुंखे यांनी युती केली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निवडणूक लढत आहेत. ही निवडणूक चुरशीची झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सांगोल्यात झाल्या आहेत.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपावर टीका केली होती. काल भाजपाच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शहाजीबापू पाटील यांच्यावर कोणतीही टीका केली नाही.
दरम्यान, काल मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा संपल्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगेच सभा घेतली. या सभेत माजी आमदार पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ही सभा संपल्यानंतर काही वेळाने सांगोला येथील माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतली. यानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ठाकरे अंबादास दानवेंनी डिवचले
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीला या छाप्यावरुन डिवचले आहे. दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. "गुवाहाटीला जाताना 'झाडी डोंगर हॉटेल' गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. 'ओके मध्ये आहे', असं म्हणावंच लागेल आता बापू!, असा टोला दानवे यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला.
गुवाहाटीला जाताना 'झाडी डोंगर हॉटेल' गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. 'ओके मध्ये आहे', असं म्हणावंच लागेल आता बापू! #सांगोला#टोले
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 1, 2025