ग्रीन पीसच्या अहवालानुसार सोलापुरातील हवा प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:34 PM2020-01-24T13:34:10+5:302020-01-24T13:36:28+5:30

२०१८ चा अहवाल प्रसिद्ध; देशात सोलापूरचा १९८ वा क्रमांक

Green Peace reports that air pollution in Solapur | ग्रीन पीसच्या अहवालानुसार सोलापुरातील हवा प्रदूषित

ग्रीन पीसच्या अहवालानुसार सोलापुरातील हवा प्रदूषित

Next
ठळक मुद्देशहरातील हवा प्रदूषित झाली असल्याने श्वसनाच्या आजाराचा धोका वाढतोग्रीन पीसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे ही प्रदूषित आहेत भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला

सोलापूर : भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. ग्रीन पीस इंडिया या पर्यावरणसंबंधी काम करणाºया संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. सोलापुरात हवेच्या दोन गुणवत्ता मापक केंद्रामधून घेतलेल्या चाचणीनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

ग्रीन पीसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे ही प्रदूषित आहेत. या प्रदूषित शहरांमध्ये २० शहरे ही महाराष्ट्रातील असून यात सोलापूर शहराचा देखील समावेश आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांची (पर्टीक्युलेट मॅटर १०) तपासणी करण्यात आली होती. यात सोलापूर शहराचा २०१८ मधील पीएम १० हा ७१ असा आहे. 

२०१७ मध्ये पीएम १० हा ६४ इतका होता. या एका वर्षामध्ये हवेमधील सूक्ष्मकणात ७ पीएम १० ने वाढ झाली आहे. शहरासाठी ठरविण्यात आलेल्या प्रमाणानुसार जर पीएम १० हा १०० च्या वर गेल्यास हवा अधिक धोकादायक बनू शकते. प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये सोलापूरचा क्रमांक हा देशात १९८ वा तर राज्यामध्ये १७ वा आहे.

श्वसनाच्या आजारांचा धोक ा
- शहरातील हवा प्रदूषित झाली असल्याने श्वसनाच्या आजाराचा धोका वाढतो. सर्दी, शिंका, नाकातून पाणी येणे, दम्याचा त्रास वाढणे असे त्रास होतात. जुना दमा असेल तर तो पुन्हा डोके वर काढतो. डोळे जळजळ करतात. श्वसनाचे नवे रुग्ण असल्यास त्यांना लवकर दम लागतो, फुफ्फुसाचे आजार होण्याचा धोका. अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे, त्वचा लाल होणे आदी त्रास होऊ शकतात असे कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. रामेश्वर खटावकर यांनी सांगितले.

शहरातील वाहनांची संख्या वाढणे, रस्त्यांची परिस्थिती, शहरातील जागेवर इमारतींची संख्या वाढणे, झाडांची कमतरता, झाडे लावताना प्रदूषणासंबंधीचा विचार न करता लावणे आदी कारणामुळे प्रदूषण वाढीस लागते. शहरात वापरली जाणारी जुनी वाहने हे देखील प्रदूषणाचे कारण आहे. सध्या शहराच्या हवेतील पीएमचे प्रमाण हे ७१ असून १०० च्या दिशेने वाटचाल सुरु आहे. प्रदूषणाची हीच गती कायम राहिल्यास अतिधोकादायक वातावरण तयार होण्यास वेळ लागणार नाही.
- डॉ. विनायक धुळप, 
पर्यावरण विभाग प्रमुख,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

Web Title: Green Peace reports that air pollution in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app