शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

वाळूजमधील द्राक्षाची गोडी हैदराबाद, कोलकत्ताकरांच्या तोंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:02 PM

कादे कुटुंबाची यशोगाथा; तीन एकरांत घेतले ५० टन उत्पादन 

ठळक मुद्दे रासायनिक खते, औषधे आणि मजुरांचा खर्च मिळून दोन लाख रुपये खर्च ५० रुपये दराने हैदराबाद आणि कोलकत्ता येथील व्यापाºयांनी हा माल उचलला़ कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे बाजारपेठ बंद आहे़ द्राक्षबागा तशाच राहिल्या

संभाजी मोटे

वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथील युवा दाम्पत्य शेतकरी आबासाहेब कादे आणि विद्या कादे यांनी तीन एकरांत सुपर सोनाका द्राक्षची लागवड करून तब्बल ५० टन उत्पादन घेतले़ ही द्राक्षे हैदराबाद आणि कोलकत्त्याच्या बाजारपेठेत पोहोचली आहेत.

 वडिलांच्या पारंपरिक शेतीला फाटा देत या जोडीने पाच वर्षांखाली तीन एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली. सुरूवातीला एप्रिल, मे महिन्यात बागेतील तण काढून बाग स्वच्छ केली. नंतर ट्रॅलीने शेणखत टाकून घेतले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेची छाटणी केली. त्यानंतर १५ दिवसांनी लहान घड दिसू लागले. घड मोठे होण्यासाठी जी. ए. या औषधाच्या फवारण्या केल्या. नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने दावण्या, भुरी, मिलिबग या रोगांचा बागेवर प्रादुर्भाव झाला. या रोगांना बाग बळी पडू नये म्हणून एम़ ४५ बाविस्टिन कर्जट  या औषधाच्या ५० फवारण्या करून बाग गोडीला आणली. तीन एकर क्षेत्रात ३३०० झाडांची लागवड केली़ आठ बाय चार अंतरावर ही लागवड करुन ठिबक सिंचनाव्दारे बागेला पाणी दिले. बागेचे लोखंडी फाउंडेशन मांडव पध्दतीचे आहे. सर्व कामे आम्ही घरीच करतो. फक्त बागेची थिनिंग करण्यासाठी तासगावहून मजूर आणल़े. शेतीमध्ये वडील सुखदेव कादे आणि आई शारदा कादे या मदत करतात. कादे कुटुंबाला २० एकर शेती आहे. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा ही पिके घेतली जातात.शेती करताना जिद्द आणि चिकाटी व नव्या तंत्राचा अवलंब केला की, यश हमखास मिळते. मात्र थोडासा धीर धरला पाहिजे, अशा शब्दांत आबासाहेब कादे यांनी आपले मनोगत मांडले़

१२० दिवसांनंतर बाग झाली गोड 

  • - रासायनिक खते, औषधे आणि मजुरांचा खर्च मिळून दोन लाख रुपये खर्च झाला़ दीड एकर बागेतील ५० रुपये दराने हैदराबाद आणि कोलकत्ता येथील व्यापाºयांनी हा माल उचलला़ 
  • - कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे बाजारपेठ बंद आहे़ द्राक्षबागा तशाच राहिल्या. राहिलेल्या बागेचे बेदाणा बनविण्याचा विचार आहे. सरासरी ४० रुपये दर धरला तरी ५० टनाचे २० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागली नाही. वडिलांच्या पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी नवीन प्रयोग करावा म्हणून सुपर सोनाका द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला़ वाणाची निवड केली. प्रयोगशील शेतीमुळे आज भरघोस उत्पन्न मिळाले. - आबासाहेब कादे  द्राक्ष उत्पादक, वाळूज, ता़मोहोळ

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीfruitsफळे