शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रुबेला लसीमुळे एकाचाही मृत्यू नाही; जागतिक आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:56 IST

सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज ...

ठळक मुद्देभारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिलीसोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज पसरविले जात आहेतभारतामध्ये गोवर व रुबेला या दोन आजारांना २०२० पर्यंत हद्दपार करण्याचे ठरविले

सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज पसरविले जात आहेत. त्या अफवांवर मुस्लिम बांधवांनी विश्वास ठेवू नये, गोवर-रुबेला लसीमुळे आजवर एकाही बालकाचा  मृत्यू झाला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी स्पष्ट केले. या लसीमुळे ना मर्द व नपुंसकता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

रुबेला लसीकरणाबाबत मुस्लीम समाज व डॉक्टरांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉक्टर उपस्थित होते.

शाळेत लस देणाºयांना तो मुलगा व मुलगी कोणत्या समाजाचा आहे हे माहिती नसते. हे मनातून काढून टाका, रुबेला लसीमुळे मुस्लीम समाजाला नामर्द, नपुंसकता असे गैरसमज पसरविले जात आहेत. शहरातील सर्वच शाळेत मुलांना लस देण्याचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम शाळेत हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाद्वारे गैरसमज पसरवत आहेत आणि आमचे मुस्लीम बांधव ते व्हिडिओ बघून मुलांना लस देण्याचे टाळत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोवर-रुबेला लसीमुळे कोणताही आजार होत नसल्याचे विविध पुरावे डॉ. सय्यद यांनी दाखविले. 

मुलांना आजार असल्यास सांगा- आपल्या मुलांना कोणता आजार किंवा इतर त्रास असल्यास लस देण्यापूर्वी पालकांनी त्याची कल्पना शिक्षकांना द्यावी. शिक्षक हे डॉक्टरला सांगतील. त्या प्रकारे त्याच्यावर उपचार केले जातील, असे डॉ. सय्यद म्हणाले. तसेच मुस्लीम बांधवांनी या लसची जनजागृती करुन सर्वांना लस द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

स्वतंत्र कक्ष सुरु- लसीकरणानंतर काही बालकामध्ये ताप येणे, चक्कर येणे, डोके दुखणे अशा प्रकारच्या तक्रारी आढळून येऊ शकतात. त्यासाठी लसीकरण  करणाºया आरोग्य सेविकांकडे आवश्यक औषधे व इंजेक्शन उपलब्ध करुन दिलेली आहेत. त्याचप्रमाणे डॉ.व्ही.एम. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल येथे सदर बालकासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

गोवर लसीचे फायदे- बालकाला गोबर लस दिल्यास त्याचे आजारापासून संरक्षण होते. समाजामध्ये गोवर व रुबेला लस एकाचवेळी ठराविक वयोगटाला दिल्यास त्याचा सर्व समाजाला फायदा होणार आहे. सदृढ व सक्षम पिढी घडविण्यास मदत होते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये गोवर व रुबेला या दोन आजारांना २०२० पर्यंत हद्दपार करण्याचे ठरविले आहे. ही लस भारतातील कंपनीकडून उत्पादित करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी लस तयार होते, तेथे मुस्लीम समाजातील डॉक्टरांनी भेट देऊन प्रत्यक्ष खात्री केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल