शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

चांगले पाहा, चांगले ऐका, चांगले वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 12:51 IST

हा लेख लिहिताना गांधीजींच्या त्या तीन माकडांची आठवण झाली जे सांगतात वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू ...

ठळक मुद्देइंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल, दूरदर्शनवरून चोवीस तास माहितीचा महापूर‘चांगले पहा’, ‘चांगले ऐका’, ‘चांगले वाचा’. याची सुरुवात आपण स्वत:पासून करून त्याचे बीज आपल्या पाल्यात रुजवणे आवश्यक बनलं आहे

हा लेख लिहिताना गांधीजींच्या त्या तीन माकडांची आठवण झाली जे सांगतात वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. गांधीजींच्या विचारांचा योग्य तो सन्मान ठेवून मला आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जेथे की दृकश्राव्य माहितीचा सर्वत्र  भडीमार होत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल, दूरदर्शनवरून चोवीस तास माहितीचा महापूर वाहत आहे, जो आपण इच्छा असूनही टाळू शकत नाही. म्हणूनच नमूद करावेसे वाटते आवर्जून ‘चांगले पहा’, ‘चांगले ऐका’, ‘चांगले वाचा’. याची सुरुवात आपण स्वत:पासून करून त्याचे बीज आपल्या पाल्यात रुजवणे आवश्यक बनलं आहे.

चांगले पाहा - आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही पाहत असतो. आपण काय पाहतोय याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. पण आजच्या काळात वाईट पाहणे आपण टाळू शकतो का?  हे सर्व बंद करणे देखील आजच्या काळात शक्य नाही. तर मग आपल्या हातात काय उरते?  ते म्हणजे चांगले पाहणे व आपल्या पाल्याला आवर्जून चांगले पाहायला  लावणे. आपल्या गावात चांगले चित्र प्रदर्शन लागले असेल, शिल्प प्रदर्शन असेल, बोध देणारा चित्रपट लागला असेल, एखादे चांगले नाटक असेल,  प्राणी संग्रहालय असेल, पुरातन वस्तूंचे संग्रहालय असेल, सायन्स सेंटर असेल, योग शिबीर असेल, खेळाच्या स्पर्धा असतील, पुरातन मंदिर असेल येथे आपण जातो का ?  मुलांना घेऊन जातो का ? नसेल तर चांगले काय आणि वाईट काय याचा फरक त्यांना कसा कळणार?.  तर याचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपण सहलीसाठी महाराष्ट्रातील किल्ले, वेरुळ अजिंठ्याची लेणी , कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र, हेमकलसा,  सावरकरांना जिथे शिक्षा झाली असे अंदमान ही ठिकाणं निवडून येथे जाऊन व ती ठिकाणे पाहून नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो व मुलांना ती देऊ शकतो तसेच महाराष्ट्रातील आध्यात्मिक मंदिरांना भेटी देऊन मुलांना अध्यात्माची कास धरायला लावणे आजच्या काळात गरजेचे आहे. एकदा चांगले पाहण्याची दृष्टी सजग झाली की वाईट जरी एखाद्यावेळेस नजरेसमोर आले तरी त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होणार नाही.

चांगले ऐका- दिवसभर आपण खूप काही ऐकत असतो. वाहनांचे कर्कश आवाज, रेडिओवरील जाहिरातींचे आवाज, लग्न-समारंभ व इतर सभारंभामध्ये लावलेले रद्दड गाण्यांचे आवाज, टवाळखोर व्यक्तींच्या  शिव्यांचे आवाज हे आपल्या कानांवर इच्छा नसताना देखील आदळत असतात. हे जर टाळायचे असेल तर आपल्याला यावर एकच उपाय म्हणजे चांगले ऐका. चांगले संगीत ऐका, चांगली गीते ऐका, नाट्य संगीत ऐका. समज असणाºया पाल्याला आपल्या गावात  होणाºया वेगवेगळ्या विषयावरील बौद्धिक  व्याख्याने, धार्मिक प्रवचने, कविसंमेलने  यांना घेऊन जा. मान्यवरांची व्याख्याने, नामवंतांच्या मुलाखती तरुणांनी आवर्जून ऐकल्या  पाहिजेत. ‘चांगला कान तयार करणे’ हे फक्त आणि फक्त आपल्याच  हातात आहे.

चांगले वाचा - कोणीतरी म्हटले आहे ‘वाचाल  तर  वाचाल’. पण आपण काय वाचतो हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. रोजच्या वर्तमानपत्रातील खून, दरोडे, घोटाळे, बलात्कार, अपघात यावरील बातम्या वाचून आपण तरुन जाऊ शकू का? तर याचे उत्तर आहे कदापि नाही. आपल्या जीवनाला दिशा द्यावयाची असेल तर चांगले वाचणे गरजेचे आहे. लहान मुलांना दैनंदिन वर्तमानपत्रातून येणाºया बोधकथा, प्रेरणा देणारे लेख, विज्ञानावरील लेख व तंत्रज्ञानावरील लेख आवर्जून वाचण्यास सांगणे गरजेचे आहे.  यामुळे त्याच्या ज्ञानात भर पडू शकेल. आलतूफालतू वाचण्यात आपला बहुमोल वेळ वाया घालवणार नाहीत.

तर आजच्या काळात चांगले पाहणे, चांगले ऐकणे, चांगले वाचणे आवश्यक झालेले आहे. त्यासाठी आवर्जून वेळ देणे गरजेचे आहे तरच वाईटापासून आपली सुटका होऊ शकेल. तर असे चांगले पाहिलेले, ऐकलेले  आणि  वाचलेले अनुभव आपण इतरांना देखील सांगणे आवश्यक आहे. विचारांचा पाया उत्तम असलेला व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकेल त्यास यशाचा मार्ग गवसेल. पण सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागणार आहे. चला तर मग आजपासूनच एक संकल्प करूया चांगलं पाहूया, चागलं ऐकूया, चांगलं वाचूया तेही आवर्जून.-महेश भा. रायखेलकर(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.)  

टॅग्स :SolapurसोलापूरSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण