Good News; सोलापूर, रत्नागिरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:05 PM2020-10-09T16:05:16+5:302020-10-09T18:03:39+5:30

उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांची माहिती; पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांची सोय होणार

Good News; Government Engineering College will be started at Solapur, Ratnagiri | Good News; सोलापूर, रत्नागिरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार

Good News; सोलापूर, रत्नागिरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार

Next

सोलापूर : सोलापूर व रत्नागिरीत पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार आहे़ शिवाय विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षे दरम्यान झालेल्या सायबर हल्लयाबाबत विद्यापीठ सायंकाळी सायबरसेलकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्हा दौºयावर होते़ सोलापूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. प्रणिती शिंदे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना सामंत म्हणाले की, मुंबई, पुणे, सोलापूर व अन्य विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षेवेळी सायबर अटॅक झाल्याने सर्व्हेर क्रॅश होऊन परीक्षांमध्ये व्यत्यय आला आहे़ त्यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात येणार आहे़ सोलापूर विद्यापीठाच्या आवारात अडीच लाख रूपये खर्चुन अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे़ या कामाचा शुभारंभ २८ किंवा २९ आॅक्टोबरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे नियोजन असल्याचे सामंत यांनी सांगितले़ राज्यातील विद्यापीठ कर्मचाºयांचे सातव्या आयोगासाठी आंदोलन सुरू आहे, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली माहिती

-        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विद्यापीठ परिसरात पुतळा उभारणार, त्यासाठीचा खर्च राज्य शासन आणि विद्यापीठ संयुक्तरित्या करणार.

-        पुतळ्याचे भूमीपुजन याच महिन्यात करण्याचा राज्य शासनाचा मानस.

-         विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन सुरु करणार.

-       विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करणार.

-       रत्नागिरी आणि सोलापूर येथे पुढील शैक्षणिक वषार्पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार.

-        तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांच्या थकित वेतन आदा करण्यासाठी निधीची तरतूद  करणार.

-         तासिका तत्वावर भरतीसाठी सेट नेट उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार.

-        प्राध्यापकांची कायमस्वरुपी भरती करता यावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार.

Web Title: Good News; Government Engineering College will be started at Solapur, Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.