Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार

आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार

भारतातील मूल्य-वर्धन ११ ते १२ टक्के असून ते १५ ते १८ टक्क्यांवर नेण्याची कंपनीची तयारी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 06:32 AM2024-04-23T06:32:28+5:302024-04-23T06:33:12+5:30

भारतातील मूल्य-वर्धन ११ ते १२ टक्के असून ते १५ ते १८ टक्क्यांवर नेण्याची कंपनीची तयारी आहे. 

5 lakh jobs in iPhone manufacturing company; Half of the supply chain will move from China to India | आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार

आयफोन उत्पादक कंपनीत ५ लाख नोकऱ्या; अर्धी पुरवठा साखळी चीनमधून भारतात हलविणार

नवी दिल्ली : आयफोन उत्पादक कंपनी ॲपल आगामी ३ वर्षांत भारतात ५ लाख नोकऱ्या देणार आहे. या नोकऱ्या व्हेंडर्स आणि सुटेभाग पुरवठादार यांच्याद्वारे निर्माण होतील. अ‍ॅपलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अ‍ॅपलचे व्हेंडर्स आणि पुरवठादार सध्या भारतात १.५ लाख नोकऱ्या देत आहेत. 

एका वृत्तानुसार, चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अ‍ॅपलने आपली सुमारे अर्धी पुरवठा साखळी भारतात हलविण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कंपनी भारतात गुंतवणूक करीत आहे. 

उत्पादन पाच पट वाढविणार 
आगामी ४ ते ५ वर्षांत भारतातील आपले उत्पादन ५ पट वाढवून ४० अब्ज डॉलरवर (३.३२ लाख कोटी रुपये) नेण्याचे उद्दिष्ट ॲपलने 
ठेवले आहे. सध्या ॲपलचे चीनमध्ये सर्वाधिक २८ टक्के देशाअंतर्गत मूल्यवर्धन होते. भारतातील मूल्य-वर्धन ११ ते १२ टक्के असून ते १५ ते १८ टक्क्यांवर नेण्याची कंपनीची तयारी आहे. 

Web Title: 5 lakh jobs in iPhone manufacturing company; Half of the supply chain will move from China to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल