Good News; साेलापुरातील इलेक्ट्रो २०२१ प्रदर्शन आता शनिवार व रविवारीसुध्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 13:47 IST2021-04-02T13:47:19+5:302021-04-02T13:47:28+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

Good News; साेलापुरातील इलेक्ट्रो २०२१ प्रदर्शन आता शनिवार व रविवारीसुध्दा
सोलापूर - सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ''इलेक्ट्रो २०२१'' या प्रदर्शनाची मुदत दि. ७ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे व महापालिका आयुक्त यांच्या सुधारित आदेशानुसार आता दि. ३ व ४ एप्रिल, शनिवार व रविवार रोजी सर्व सहभागी शोरुम्स् सुरु राहतील असे पत्रक सेडाचे अध्यक्ष ईश्वर मालू यांनी काढले आहे.
यंदा नटराज आटा चक्की हे मुख्य प्रायोजक असून एचडीएफसी बँक हे सह प्रायोजक आहेत . कंझ्युमर फायनान्स असोसिएट म्हणून बजाज फायनान्स हे आहेत. सेडा द्वारे आयोजित या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनास सोलापूरकरांनी अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदी करणाऱ्या ग्राहकांस लकी ड्रॉ द्वारे सुमारे एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची बक्षिसे ही जाहिर करण्यात आली आहेत. तरी ग्राहकांना मिळालेली ही अधिकची संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन इलेक्ट्रो चेअरमन शिवप्रकाश चव्हाण यांनी केले आहे.