नागोबाची वाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By दिपक दुपारगुडे | Published: April 16, 2024 05:58 PM2024-04-16T17:58:06+5:302024-04-16T17:58:40+5:30

लक्ष्मी प्रसाद बारबोले (वय २१, ता. नागोबाचीवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत जगदाळे आणि कॉन्स्टेबल गोरख भोसले, पोलिस उपनिरीक्षक ठोंगे घटनास्थळी दाखल झाले.

Girl commits suicide by hanging herself at Nagobachi Wadi | नागोबाची वाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

नागोबाची वाडी येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर  : बार्शी तालुक्यात नागोबाची वाडी येथील एका २१ वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली.

लक्ष्मी प्रसाद बारबोले (वय २१, ता. नागोबाचीवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत जगदाळे आणि कॉन्स्टेबल गोरख भोसले, पोलिस उपनिरीक्षक ठोंगे घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत बार्शी ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे अधिकारी यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी बारबोले सोमवारी रात्री पावणेनऊ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण रुग्णालयातील नोंदीवरून अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. एक महिन्यापूर्वी लक्ष्मीच्या पतीने बार्शी शहर पोलिस ठाणे हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी अशी अपत्ये आहेत. अधिक तपास प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत जगदाळे हे करत आहेत.
 

Web Title: Girl commits suicide by hanging herself at Nagobachi Wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.