गजानन महाराजांच्या पालखीचे आज जिल्ह्यात आगमन; सायंकाळी होणार स्वागत

By Appasaheb.patil | Published: June 21, 2023 02:56 PM2023-06-21T14:56:24+5:302023-06-21T14:57:22+5:30

या पालखीत जवळपास सातशे वारकरी सहभागी आहेत.

gajanan maharaj palkhi arrived in the district today a reception will be held in the evening | गजानन महाराजांच्या पालखीचे आज जिल्ह्यात आगमन; सायंकाळी होणार स्वागत

गजानन महाराजांच्या पालखीचे आज जिल्ह्यात आगमन; सायंकाळी होणार स्वागत

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: श्रीक्षेत्र शेगांव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होणार आहे. पालखीचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम उळेगांव (ता.द.सोलापूर) येथे असणार आहे.

या पालखीत जवळपास सातशे वारकरी सहभागी आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल होते. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर या पालखीचे स्वागत करण्यात येते. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरसरदेशपांडे यांच्यासह अन्य अधिकारी या पालखीचे स्वागत करणार आहे. सलग दोन वर्ष प्रशासनातील अधिकारी या पालखीचे स्वागत करीत आहेत.

आज पालखीचा मुक्काम उळेगावात असतो. येथे रात्री किर्तन, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्यानंतर उद्या गुरूवार २२ जून २०२३ रोजी पहाटे ही पालखी सोलापूर शहरात दाखल होते. हा पालखी सोहळा दोन दिवसासाठी सोलापुरात मुक्कामी असतो.

Web Title: gajanan maharaj palkhi arrived in the district today a reception will be held in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.