शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकार्यक्षम सार्वजनिक ग्रंथालयांचे भवितव्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्याची मागणी वाढत असताना शासन स्पष्ट भूमिका घेत ...

सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्याची मागणी वाढत असताना शासन स्पष्ट भूमिका घेत नाही. त्यामुळे अकार्यक्षम ठरवलेल्या पण मोठ्या कष्टाने सुरू केलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. बँकेतून वेतन देण्याच्या चर्चेने कर्मचारी मात्र सुखावले आहेत.

राज्य सरकारने २०१२ - १३ सालापासून नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता न देण्याचे धोरण अवलंबले आहे. याबाबत ७ जून २०१४ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यामुळे अशी असंख्य ग्रंथालये बंद करावी लागली. सहा वर्षांत त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. अकार्यक्षम म्हणून घोषित केलेल्या ग्रंथालयांच्या व्यवस्थापनांनी वार्षिक अहवाल, लेखा परीक्षण अहवाल दिला नाही. या एकाच कारणाने हजारो ग्रंथालये बंद असल्याची नोंद शासन दरबारी झाली. याच कारणाने ती अकार्यक्षम ठरली. आता नियमितपणे पूर्तता करूनही या ग्रंथालयांची तपासणी केली जात नाही, अशी स्थिती आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ग्रंथालयांचाही कारभार आहे. अलीकडेच त्यांनी नव्या ग्रंथालयांना शासन मान्यता देण्याचे सूतोवाच केले आहे. मात्र, दप्तर दिरंगाईमुळे अकार्यक्षम ठरलेल्या संस्थांवर लाखो रुपये खर्ची पडले. या राष्ट्रीय संपत्तीचे काय करायचे, असा प्रश्न आहे. नव्याने मान्यता दिल्यास जिल्हा विकास निधीतून त्यासाठी तोकडी तरतूद केली जाते. त्याचा भार थेट शासनावर पडत नाही. जुन्या ग्रंथालयांना उर्जितावस्था दिल्यास उपलब्ध साधन सामग्रीचा वापर, कर्मचाऱ्यांना आधार मिळणार आहे.

---------

हजारो ग्रंथालयांचे भवितव्य टांगणीला

गेल्या ७ - ८ वर्षांत अकार्यक्षम ठरवलेल्या ग्रंथालयांनी पूर्तता केल्यास त्याची तपासणी करून अनुदान देण्याची मागणी होत आहे. पूर्तता करणार नाहीत, अशी ग्रंथालये ताब्यात घ्यावीत, अथवा सक्षम संस्थांना चालवण्यास द्यावीत. निर्णय न झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात ९४७ ग्रंथालये आहेत. त्यातील १११ अकार्यक्षम असून, ८३६ कार्यक्षम आहेत. तपासणी करून संधी दिल्यास बंद ग्रंथालयांची दारे उघडतील, कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल.

--------

ग्रंथालय चळवळ वाढली पाहिजे, वाचन संस्कृतीला बळकट करण्याची गरज आहे. या विभागाकडे शासन उदासीन भूमिकेने पाहाते. वेळेवर अनुदान मिळत नाही. यात बदल व्हायला हवा.

- सदाशिव बेडगे

सोलापूर, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता