दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचं मिळालं फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:19+5:302020-12-05T04:45:19+5:30

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल घरी पत्नी निशिगंधा, बहीण प्रियांका, वडील महादेव व आई पार्वती यांनी पेढे भरवून रणजित यांचे ...

The fruit of ten years of work for the students | दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचं मिळालं फळ

दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचं मिळालं फळ

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल घरी पत्नी निशिगंधा, बहीण प्रियांका, वडील महादेव व आई पार्वती यांनी पेढे भरवून रणजित यांचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक विजय चव्हाण हेही उपस्थित होते.

----

प्रत्येकाला असा मुलगा असावा. पुरस्काराची निम्मी रक्कम त्याने इतरांना दिली हे चांगलं केलं. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

- पार्वती डिसले, आई

---

दोन्ही मुलांची एकाच दिवशी गूड न्यूज

महादेव डिसले हेदेखील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक आहेत. या पिता-पुत्राने एकाच केंद्रात नोकरी केली आहे. महादेव डिसले यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मोठा मुलगा अमित हा इंजिनिअर असून, तो महिंद्रा कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर आहे. योगायोग म्हणजे या आनंदाच्या दिवशीच त्यालाही पदोन्नती मिळाली आणि दुसऱ्या मुलाला जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळाला हे अभिमानास्पद असल्याचेही महादेव डिसले यांनी सांगितले.

----

जगभरातील शिक्षकांसाठी नोबेल मानला जाणारा हा पुरस्कार हा देशभरातील शिक्षक आणि मुलांना समर्पित करतोय. देशातील शिक्षकाला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे. ‘लोकमत’ने नेहमीच माझ्या उपक्रमाला सहकार्य केले आहे. एवढेच नव्हे तर हा पुरस्कार जाहीर होण्याअगोदरच ‘लोकमत’ ने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. ही अभिमानाची बाब आहे.

-रणजितसिंह डिसले

Web Title: The fruit of ten years of work for the students