शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पाच अट्टल गुन्हेगार झाले तडीपार!

By admin | Updated: July 2, 2014 00:52 IST

आम आदमी खुश : फौजदार चावडी पोलिसांची कामगिरी

सोलापूर : आम आदमींना नेहमी त्रास देत शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेला सुरुंग लावण्याबरोबर गुन्ह्यांची मालिका चालविणाऱ्या फौजदार चावडी हद्दीत ५ अट्टल गुन्हेगारांना सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. नागेश शिवाजी महानूर (वय २४, रा. क्रांती नगर झोपडपट्टी, दमाणी नगर), शंकर अंबादास बनसोडे (वय ३२), सुधाकर कुमार कांबळे (वय २८, दोघे रा. उत्तर कसबा, पत्रा तालीम), सादिक गुडूसाब शेख (वय २४, रा. चमन शहावली टेकडी, सिद्धेश्वर पेठ) आणि रघुनाथ शंकर कोळेकर (वय २९, रा. चौपाड, उत्तर कसबा) अशी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आम आदमींना त्रास देणे, जबरी चोऱ्या करणे, दरोडा घालणे, मारामारी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागण्याचे प्रकार करणे आदी प्रकारांमुळे फौजदार चावडी हद्दीतील शांतता धोक्यात आली होती. त्यांच्याविरुद्धच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवून देण्यात आला. पोलीस आयुक्तांनी पहिल्या दोन आरोपींना दोन वर्षांकरिता आणि इतर तिघांना तीन महिन्यांकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. (गुन्हे) बाळकृष्ण साळुंके, डी. बी. पथकाचे प्रमुख एस. के. खटाणे, पथकातील राजकुमार तोळणुरे, आप्पा पवार, मच्छिंद्र जाधव, बंडू पवार, धनंजय सुरवसे, लक्ष्मण खरात, संजय गुरव, दिलीप चौगुले, सुरेश जमादार, रोहन ढावरे, शीतल शिवशरण, दादासाहेब सरवदे, विनोद रजपूत आदींनी ही कामगिरी केली.------------------------इतरांवरही कारवाई व्हावीआम आदमींवर दहशत बसवणे, किरकोळ आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणे हे शांततेच्यादृष्टीने घातक आहे. फौजदार चावडी पोलिसांच्या विशेष पथकाने तडीपारीची जी कारवाई केली, तशी कारवाई इतर पोलीस ठाण्यांमधील गुन्हेगारांवर करण्याची मागणी होत आहे.