आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:49 IST2025-11-08T20:48:28+5:302025-11-08T20:49:37+5:30
Solapur crime: एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने आधी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं?
Crime News: पंधरा दिवसांपूर्वी विषारी रसायन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर तरुणाने सिद्धेश्वर मंदिर तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. सागर फलमारी (वय ३०, रा. विडी घरकूल, कुंभारी) असे तरुणाचे नाव आहे.
रसायन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर सागर फलमारी (वय ३०, रा. विडी घरकूल, कुंभारी) या तरुणाने सिद्धेश्वर मंदिर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. फायनान्समधून कर्ज घेऊन दुसऱ्यांना दिले होते, ते पैसे परत न आल्याने सागर हा मानसिक तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
सागरचा मृतदेह सिद्धेश्वर तलाव येथील विष्णू घाट येथे पाण्यावर तरंगताना मिळून आला. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे हवालदार एस. एच. घुगे यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.
मृत सागर फलमारी याने एका फायनान्समधून कर्ज काढून इतरांना दिले होते. मात्र, ज्यांना पैसे दिले होते ते पैसे परत करीत नसल्याने तो मानसिक तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज नातेवाइकांनी वर्तविला.
पाचशे रुपये कामावरून घेऊन लवकर गेला घरी
सागरने बुधवारी सायंकाळी काम करीत असलेल्या फर्निचरच्या दुकानाच्या मालकाकडून पाचशे रुपये घेतले होते. त्यानंतर तो घरी गेला.
जाताना तो गुजरात येथील बहिणीला बोलून तो तेथे येणार असल्याचे त्यांना सांगितले. दरम्यान, तो आठ वाजण्याच्या सुमारास घरी आईकडे मोबाइल देऊन बाहेर पडला. त्यानंतर ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.