लैंगिक अत्याचारप्रकरणी अभिराज उबाळेसह दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:00 IST2019-06-24T13:55:33+5:302019-06-24T14:00:45+5:30
फेसबुक लाईव्हव्दारे अभिराज उबाळे याने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

लैंगिक अत्याचारप्रकरणी अभिराज उबाळेसह दोघांवर गुन्हा दाखल
पंढरपूर : लग्नाचे अमिष दाखवून, धमकी देत जबरदस्तीने लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पत्रकार अभिराज मधुकर उबाळे (रा. आंबेडकर नगर, पंढरपूर) यांच्यासह दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पिडीतेसोबतचे अश्लील फोटो, व्हीडीओज काढले. ते फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमात पसरविण्याची धमकी देवून ७ लाख रूपयांची खंडणी स्वीकारली़ त्यानंतर अधिक ३ लाख रुपयाची खंडणी मागत असल्याबाबतची तक्रार पिडीत मुलीने अभिराज मधुकर उबाळे याच्याविरुद्ध दिली आहे. त्यामुळे अभिराज उबाळे याच्यासह दोघांविरुद्ध भा. द. वि. सं. कलम ३७६, ४१७, ३८४, ३८५, ५००, ५०६, ३४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ प्रमाणे पिडीत महिलेचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.