चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 13:08 IST2024-10-06T12:36:47+5:302024-10-06T13:08:25+5:30

सोलापूर येथे झालेल्या भीषण अपघातात कामगारांसह फिरायला जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला

Fatal accident solapur car and tempo Four people were killed three were seriously injured | चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर

चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर

संजय पवार

नातेपुते :  पुणे- पंढरपुर मार्गावरील कारूंडे (ता.माळशिरस) येथे पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लासूर्णे (ता.इंदापूर ) येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून चुकीच्या दिशेने निघाल्याने हा अपघात लासूर्णे येथून २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर घडला.

यामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेस शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) हे जागीच ठार झाले. तर या अपघातात आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Fatal accident solapur car and tempo Four people were killed three were seriously injured