शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत !

By admin | Updated: June 17, 2014 01:22 IST

शेतकरी आत्महत्या समितीची वर्षभरात बैठकच नाही : दहा महिन्यात बारा आत्महत्या

 सोलापूर: ऊसपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातही अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असले तरी मदतीसाठी समितीची वर्षभरात एकही बैठक झाली नाही. मागील दहा महिन्यांत १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. या समितीची बैठक २३ जुलै २०१३ रोजी झाली होती. त्या बैठकीत दोन शेतकऱ्यांची कुटुंबे मदतीसाठी पात्र ठरली होती. सोलापूर जिल्हा दुष्काळी असला तरी अलीकडे ऊस व अन्य बागायती पिकांचे क्षेत्रही तेवढेच वाढले आहे. फळबागांचे क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे. उजनी व अन्य धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. पावसाचे पडणारे पाणी साठविण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागात लहान-मोठे तलावही मोठ्या प्रमाणावर आहेत. असे असले तरी बागायती क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याने व त्याप्रमाणात पुरेसा पाऊस पडत नसल्याने पाण्याचे संकटही तेवढेच आहे. एक-दोन वर्षे पाऊस सरासरीपेक्षा अधिक तर एखादे वर्ष पाऊस अत्यल्प पडतो. याचा फटका शेतीपिकांना बसत आहे. शेती बागायती केल्यानंतर पाणी कमी पडू लागले तर शेतकरी मोठ्या खोलीचे बोअर घेतात. त्यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. खर्च करुनही पाणी मिळेलच असे नाही. यामुळे घेतलेले पीकही शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता नसते. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. -----------------------------------गळफास घेतलेले शेतकरीगळफास घेऊन आत्महत्या केलेले शेतकरी- वामन कुलकर्णी (चिंचोली, माढा), प्रशांत बागल (गादेगाव, पंढरपूर), भजनदास गुंड (लाडोळे, बार्शी), प्रीती चंद्रकांत नरुटे (पोखरापूर, मोहोळ), शत्रुघ्न गाटे (सारोळे, बार्शी), सोमनाथ मदने (कुर्डूवाडी, माढा), रखमाजी थोरात (अंत्रोळी, दक्षिण सोलापूर), ज्ञानदेव जाधव (सारोळे, मोहोळ), दादासाहेब अवताडे (विरवडे, मोहोळ), --------------------------विचार करण्याची गरज...शेतीसाठी शासनाच्या मोठ्या प्रमाणावर योजना असल्या तरी सहजासहजी देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत नाही. स्वत:च्या नावावरील सातबारा उताऱ्यापासून पीक कर्ज काढण्यासाठीही शेतकऱ्यांना त्रासावे लागते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद व अन्य खात्याकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना असलेल्या योजना यावर्षी गरज आहे म्हणून अर्ज केला तर पुढच्या वर्षीही सहज मिळेल याची शाश्वती नसते. पाण्यासाठी संषर्घ करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान तीन-तीन वर्षे मिळत नाही. ठिबक व अन्य योजनांच्या अनुदानासाठी घालाव्या लागणाऱ्या हेलपाट्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ व पैसा अधिक खर्च होतो.