हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:04+5:302020-12-05T04:46:04+5:30

रावगाव व शेगूड सीमेवर लिंबेवाडी शिवारात फुंदे हे ज्वारीला पाणी देत होते. त्यांच्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्यांना ...

Farmer killed in wild animal attack | हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

रावगाव व शेगूड सीमेवर लिंबेवाडी शिवारात फुंदे हे ज्वारीला पाणी देत होते. त्यांच्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्यांना ठार केले. रात्र झाली तरी कल्याण हे शेतातून घरी न परतल्याने घरच्या लोकांनी शोध घेतला. दरम्यान, शेतात कल्याण यांच्या चपला व रक्त जमिनीवर सांडलेले दिसले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता कल्याणचे मुंडके नसलेला मृतदेह शेतात झुडपात आढळून आला. त्यानंतर शोध घेतला असता थोड्या अंतरावर मुंडके सापडले. रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला. हिंस्र प्राण्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Farmer killed in wild animal attack