संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:28 IST2025-10-19T12:26:51+5:302025-10-19T12:28:14+5:30
सोलापुरात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी एका विवाहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले
Solapur Crime: सोलापुरातल्या बार्शीमध्ये एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सोमनाथ सुरेश रोंगे (३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, ही घटना गुरुवारी ११:३० वाजेपूर्वी बार्शी तालुक्यात खडकलगाव येथे घडली. याबाबत मृत सोमनाथचे वडील सुरेश रंगनाथ रोंगे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा मुलगा सोमनाथ याचे एका महिलेसोबत दीड वर्षापासून संबंध होते. सोमनाथ हा रोजंदारीने काम सांगण्यासाठी नेहमी तिच्याकडे जात असे. त्यातून त्यांची ओळख झाली अन् त्यातून संबंध वाढले. त्याच्याकडून ती वारंवार पैशांची मागणी करीत असे, पैसे नाही दिले की, त्याच्याशी वाद घालत असे. संबंध ठेवले नाहीत, तर केस करीन, अशा धमक्या देत असल्याने सोमनाथ सतत मानसिक तणावात राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने वडिलांना तिच्या धमक्यांविषयी सांगितले होते. १७ ऑक्टोबरला सकाळी तो शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर त्याने शेंडावाफा शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.