शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

करमाळ्यात धुळीचं साम्राज्य अन्‌ अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने व मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे ...

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने व मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या करमाळा शहरात सर्व प्रभागांत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहराच्या प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्यांचा त्रास होत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. संगम चौक ते मुथानगर दरम्याचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्याचबरोबर गायकवाड चौक ते दलित स्मशानभूमीपर्यंत रस्ता, महात्मा फुले पुतळा ते सुमंतनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देवीचा माळ रोड आदी रस्त्यासह शहरातील रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. करमाळा शहरातील नगरपालिकेच्या मालकीचे भाडेपट्ट्याने दिलेल्या गाळ्याचे कोरोना काळातील भाडे माफ करणे गरजेचे आहे.

शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात चिलारीची झाडे वाढलेली आहेत. जीन मैदानात आठवडा बाजार भरतो. या ठिकाणी स्वच्छतेची गरज आहे. शहरातील गटारी दररोज साफ करुन त्यामध्ये पावडर टाकणे गरजेचे आहे. सार्वजनिक लघुशंकागृहाची संख्या कमी झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या कालखंडात कोरोना प्रार्दुभावामुळे शहरातील व्यापार, उद्योगधंद्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासह अन्य मागण्या नगरपालिका प्रशासनाकडून त्वरित मान्य कराव्यात अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, यांची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे, महिला तालुकाप्रमुख प्रियंका गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयूर यादव, युवासेना शहरप्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, संजय भालेराव, पंकज परदेशी, उमेश पवार, शाखाप्रमुख महमंदअफीस कुरेशी, युवासेना उपशहरप्रमुख अविनाश भिसे, युवासेना उपशहरप्रमुख प्रसाद निंबाळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्याचा प्रयत्न

करमाळा शहरातील अंतर्गत रस्ते तीन वर्षांपूर्वीचे असून, ते कालबाह्य झाले आहेत. रस्त्यासाठी ७ कोटी रुपये मंजूर झाले असून त्याच्या निविदा निघाल्या आहेत. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी केला आहे.

- वैभवराजे जगताप,नगराध्यक्ष करमाळा नगरपरिषद.