शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भजन सुरू असताना मित्राच्या अंगावर टाळ भिरकावून केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:54 IST

माढा तालुक्यातील अकुलगावातील घटना: मित्रांनी चेष्टा केल्याचे कारण

ठळक मुद्दे- माढा तालुक्यातील अकुलगावातील घटना- चेष्टा केल्याच्या कारणावरून टाळ फेकून मारल्याची घटना- कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 

सोलापूर : हनुमान मंदिरात भजन सुरू असताना मित्रांनी चेष्टा केल्याच्या कारणावरून टाळ फेकून मारल्याची घटना माढा तालुक्यातील अकुलगाव येथे सोमवारी रात्री घडली. 

याप्रकरणी ज्योतीराम बोबडे (वय ४२, रा. अकुलगाव, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय क्षीरसागर याच्याविरूद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकुलगाव येथील मारूती मंदिरात आठवड्यातून भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता भजन सुरू होते. त्यावेळी आरोपी धनंजय हा भजन पथकात टाळ वाजवित होता. शेजारीच फिर्यादी ज्योतीराम व इतर मित्र बसले होते. 

मित्रांमध्ये कानात काहीतरी कुजबुज झाली व ते सर्वजण हसले. ही चेष्ट मस्करी सहन न झाल्याने संतापलेल्या धनंजय यांने हातातील टाळ ज्योतीरामच्या डाव्या हाताच्या कोपºयावर फेकला. टाळ लागल्याने ज्योतीराम जखमी झाला. त्यानंतर धनंजय याने मित्रांना शिवीगाळ केली. याबाबत धनंजय याच्याविरूद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ५0४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक घाडगे यांच्याकडे देण्यात आला आहे. बुधवारी घाडगे घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी गेल्यावर मारूती मंदिराच्या कट्ट्यावर फिर्यादी व आरोपी गळ्यात हात घालून बसल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी हे दोघे बालपणापासून मित्र असल्याचे सांगितले. चेष्टामस्करीत अशी घटना घडल्याचे लोक सांगत असल्याचे पोलीस नाईक घाडगे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाCrime Newsगुन्हेगारी