शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता; पाणवठ्यात दगड टाकून पाण्याचा केला फुगवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:32 IST

नान्नज येथील माळढोक अभयारण्यातील वनपर्यवेक्षक वन्यप्राण्यांची भागवत आहेत तहान

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे दुर्मिळ अशा माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी गुण्यागोविंदाने राहतातकमी पर्जन्यमानामुळे माळढोक अभयारण्य परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई

वडाळा : सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे़ पाण्यासाठी रानोमाळ फिरणाºया ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे सुद्धा अमृत वाटू लागले आहे़ दुष्काळात पशुपक्ष्यांसह प्राण्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नान्नज (ता़ उ़ सोलापूर) येथील अभयारण्यातील वनपर्यवेक्षकांनी माळढोक क्षेत्रात ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करून प्राण्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे दुर्मिळ अशा माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी गुण्यागोविंदाने राहतात; मात्र मागील काही वर्षापासून या भागात पडणाºया कमी पर्जन्यमानामुळे माळढोक अभयारण्य परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

पशुपक्ष्यांसह प्राण्यांची पाण्यावाचून होणारी तडफड व घशाला पडलेली कोरड, तहान भागविण्यासाठी वनपर्यवेक्षकांनी माळढोक परिसरात ठिकठिकाणी पाणवठे निर्माण केले आहेत़ या पाणवठ्यात कुठे टँकरव्दारे तर कुठे हातपंपातील पाण्याने पाणीपुरवठा करून पाणवठे भरून घेतले जातात.

 उत्तर सोलापूर तालुक्यात कोणत्याही प्रकारचे पाण्याचे स्रोत नसल्यामुळे व पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याची पातळी खूपच खोल गेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील वृक्षांची ही पूर्णत: पानगळ झाली व जंगलातील असलेले गवतही पूर्ण वाळून गेले़ त्यामुळे वन्य प्राणीचाºयासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी इकडे-तिकडे सैराट फिरू लागले आहेत.

माळढोकच्या वनपर्यवेक्षकांनी वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर बार्शीरोड लगत असलेल्या अभयारण्यातील  नागनाथ मंदिराजवळील  पाणवठ्यांमध्ये हात पंपाने पाणी सोडले, परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पंपाला पाणी कमी येऊ लागले़ त्यामुळे वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्यांमध्ये जेवढे हात पंपाने सोडता येईल तेवढे पाणी खेचून त्यामध्ये सोडले परंतु पाणवठा पूर्ण न भरता त्यामध्ये निम्म्याभागात दगड अंथरून पाण्याचा फुगवटा करुन वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई