उजनीतून विसर्ग वाढविला; भीमा नदीला पूर येणार, सीना नदीचे पाणी हायवेवर; सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:47 IST2025-09-29T14:47:13+5:302025-09-29T14:47:31+5:30
दरम्यान, सोमवार २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता उजनी धरणातून १ लाख ५ हजाराचा विसर्ग करण्यात आला आहे. या विसर्गामध्ये विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.

उजनीतून विसर्ग वाढविला; भीमा नदीला पूर येणार, सीना नदीचे पाणी हायवेवर; सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सद्यस्थितीत उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आत दिवसभरात भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तहसिल प्रशासनाने लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान, सोमवार २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता उजनी धरणातून १ लाख ५ हजाराचा विसर्ग करण्यात आला आहे. या विसर्गामध्ये विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे. सीना नदीचा पूर आल्याने सोलापूर-विजयपूर महामार्ग सकाळपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहनांसाठी महामार्ग विभागाने पर्यायी मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर-कोल्हापूर महामार्ग सुरू करण्यात आला असून सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.