शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन मांगी, कुंभेज तलावात पाणी सोडा; संघर्ष समितीची मागणी

By admin | Updated: May 6, 2014 17:17 IST

करमाळा :

करमाळा : करमाळा तालुक्याच्या हक्काचे म्हणजेच कुकडीचे पाणी टंचाईच्या परिस्थितीत मांगी व कंुभेज तलावात सोडावे या प्रमुख मागणीसाठी आज येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व कुकडी संघर्ष समितीच्या वतीने प्रचंड घोषणाबाजीत दीड तास धरणे आंदोलन करण्यात आले.करमाळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाणवू लागली असून, ४० गावांतून पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मांगी तलावाखालील १६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्यास दीड महिना बाकी असून, त्याकरिता कुकडी धरणातून मांगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे व कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुजित बागल यांनी केले. या आंदोलनात पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड, बाजार समितीचे संचालक दादासाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड, अण्णा सुपनवर, प्रमोद कुलकर्णी,ॲड़ शिवाजीराव मांगले, गोवर्धन करगळ, संभाजीराजे बागल, बाळासाहेब बागल, दिवाण बागल, अण्णासाहेब बागल, हनुमंत बागल,विलास बरडे,गणेश नरसाळे,उमेश बागल,आनंद भांडवलकर आदींसह मांगी,रावगाव,भोसे,हिवरवाडी,वडगाव भागातील शेतकरी उपस्थित होते.यावेळी पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड, महेश चिवटे यांची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार राजंेद्र पोळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी बंदोबस्त ठेवला होता. वार्ताहरचौकट घेणेपाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याबिगर राहणार नाही, कुकडीचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर दिल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.कोट करणेस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार गतवर्षी वीज बंद काळातील वीज बिल माफ करून बिले दुरूस्त करून शेतकर्‍यांना देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला असून मान्यता मिळताच शेतकर्‍यांना गतवर्षीचे वीज बिल कमी करून नवीन बिल तयार करून दिले जाईल, असे वीज वितरण कं.चे सहायक अभियंता पोपटराव चव्हाण यांनी सांगितले.