बसच्या चाकाखाली अडकून भाविकाचा मृत्यू, मार्डी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:53 IST2018-09-17T13:20:09+5:302018-09-17T14:53:46+5:30

बसच्या चाकाखाली अडकून भाविकाचा मृत्यू, मार्डी येथील घटना
सोलापूर : मार्डी (ता़ उ़ सोलापूर) येथील यमाई मंदिराशेजारी प्रवाशांच्या प्रतिक्षेत बस थांबली होती. यावेळी चालकाने गाडी सुरू करून पाठीमागे घेताना बस मागे थांबलेल्या भाविकांचा चाकाखाली अडकून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली
भागवत तुकाराम गांवधरे (वय ४१ रा. कासेगांव, ता़ पंढरपूर) असे मरण पावलेल्या भाविकाचे नाव आहे. सोमवार १७ सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी असल्याने मार्डी येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी गांवधरे हे आले होते़ दर्शन घेऊन झाल्यानंतर बस थांबा तळावर गांवधरे हे थांबले असता सोलापूर महानगरपालिकेचीएमएच १३ एएक्स ९५०६ या सिटीबसच्या चालकाने पाठीमागे न पाहता बस सुरू केली.
यावेळी बस पाठीमागे घेत असताना मागे थांबलेल्या गांवधरे याचा बसच्या चाकाखाली अडकून मृत्यू झाला़ या घटनेची माहिती समजता पोलीस हेडकॉन्टेबल चव्हाण, जमादार, पोलीस पाटील अमोल कदम, महिला पोलीस कर्मचारी म्हेत्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली़ सदर अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले़