शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : सात-आठ महिलांनी दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:47 IST

गणेश दादाराव पांढरे (रा.कोन्हेरी, ता. मोहोळ) हे मोटारसायकलवरुन गावाकडे निघाले होते. त्यांना हिवरे पाटीजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका महिलेने हात करत मदत मागून आमची उसाची टोळी पुढे उतरली आहे.

सोलापूर/मोहोळ - मोटारसायकलवरुन निघालेल्या एका दुचाकीस्वारास 8 महिलांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमची ऊसाची टोळी पुढे गेली आहे, त्यासाठी लिफ्ट देण्याची मागणी करत 7 ते 8 महिलांनी चाकूचा धाक दाखवत त्यास लुटले. 19 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता ही घटना घडली. या महिलांनी दुचाकीस्वाराच्या खिशातील पैशांवर डल्ला मारला. तसेच, त्याला मारहाणही केली. 

गणेश दादाराव पांढरे (रा.कोन्हेरी, ता. मोहोळ) हे मोटारसायकलवरुन गावाकडे निघाले होते. त्यांना हिवरे पाटीजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका महिलेने हात करत मदत मागून आमची उसाची टोळी पुढे उतरली आहे. मी कामानिमित्त मागे थांबले होते. मला त्या टोळीजवळ सोडा अशी विनंती केल्याने पांढरे यांनी त्या महिलेला गाडीवर बसवले पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या महिलेने एका ढाब्याजवळ गाडी थांबवा आमच्या इतर सहकारी महिला आहेत, असे सांगितल्याने पांढरे यांनी गाडी थांबवली. त्यांची गाडी थांबल्याचे बघताच इतर सात ते आठ महिला त्यांच्या गाडीला गराडा घालून उभ्या राहिल्या त्यातील एका महिलेने त्यांच्या खिशातील दोन हजार ४०० रुपये काढून घेतले. तसेच इतर महिलांनी त्यांना मारहाण करत चाकूने भीती घातली याबाबत कोणाला काही सांगितले तर आम्ही तुझ्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी देऊन निघून गेल्या. या महिलांसोबत दोन ते तीन लहान मुलेही असल्याचे फिर्यादीत म्हटले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरPoliceपोलिस