Crime News : भाऊजीच्या डोक्यात मेव्हण्याने घातला हातोडा, 4 जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 13:09 IST2022-01-21T13:08:14+5:302022-01-21T13:09:38+5:30

Crime News : याबाबत मनोज बापू चौधरी (रा. तांबोळे) यांनी फिर्याद दिली आहे.

Crime News : A hammer was struck on the head of the nephew with a machete, a crime against 4 persons | Crime News : भाऊजीच्या डोक्यात मेव्हण्याने घातला हातोडा, 4 जणांविरुद्ध गुन्हा

Crime News : भाऊजीच्या डोक्यात मेव्हण्याने घातला हातोडा, 4 जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर/मोहोळ : बहिणीची बदनामी सहन न झाल्याने एका भावाने चक्क भाऊजीच्या डोक्यात हातोडा घालून जखमी केल्याची घटना मोहोळ तालुक्यात तांबोळे येथे घडली. २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेसह ४ जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मनोज बापू चौधरी (रा. तांबोळे) यांनी फिर्याद दिली आहे. मनोज यांचे सन २०२१ मध्ये औंढी येथील शिवानी चव्हाण मुली सोबत लग्न झाले. तीन वर्षांपूर्वी पत्नी शिवानी ही घरात वादविवाद करून माहेरी गेली होती. दरम्यान, एकमेकांविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार आपापसांत मिटवून दीड वर्षापासून पत्नी शिवानी ही तांबोळे येथे नांदायला गेली. त्यानंतरही घरात भांडणे होत राहिली.

२० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान मनोज चौधरीचे मेहुणे हनुमंत सदाशिव चव्हाण, विठ्ठल सदाशिव चव्हाण व सासू मैनाबाई चव्हाण, सासरे सदाशिव चव्हाण असे चौघे जण त्यांच्या घरी आले. मनोज चौधरी याला भाऊ सुनील चौधरी कुठे आहे, आमच्या मुलीची लोकात बदनामी केली आहे असा जाब विचारला. इतक्यात सुनील हा दुचाकीवरून घरी आला. त्याला पाहाताच हनुमंत व सदाशिव या दोघांनी काठ्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी मनोज हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, हनुमंत याने समोर पडलेला हातोडा घेऊन त्यांच्या डोक्यात मारला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.
 

Web Title: Crime News : A hammer was struck on the head of the nephew with a machete, a crime against 4 persons