धर्मांतरप्रकरण: कोऱ्या बाँडवर मुलीच्या घेतल्या सह्या, सत्र न्यायालयाने आरोपीची कोठडी वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:20 IST2026-03-10T16:18:57+5:302026-03-10T16:20:17+5:30

आरोपीने त्या मुलीच्या कोऱ्या बाँडवर सह्या घेतल्या, ते बॉन्ड जप्त करावयाच्या असल्याने ही कोठडी सुनावण्यात आली.

Conversion case: Girl's signatures on blank bond, sessions court extends accused's custody | धर्मांतरप्रकरण: कोऱ्या बाँडवर मुलीच्या घेतल्या सह्या, सत्र न्यायालयाने आरोपीची कोठडी वाढवली

धर्मांतरप्रकरण: कोऱ्या बाँडवर मुलीच्या घेतल्या सह्या, सत्र न्यायालयाने आरोपीची कोठडी वाढवली

सोलापूर अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने धर्मातर करण्यास लावून अत्याचार केल्या प्रकरणातील इसराईल अहमद शेख (रा. सोलापूर) याला सत्र न्यायाधीशांनी दोन दिवसांची वाढीव कोठडी सुनावली. आरोपीने त्या मुलीच्या कोऱ्या बाँडवर सह्या घेतल्या, ते बॉन्ड जप्त करावयाच्या असल्याने ही कोठडी सुनावण्यात आली.

धर्मांतर प्रकरणात एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यातील इसराईल, हुजेब आणि अॅड. खतीब यांना अटक करण्यात आली होती. त्यातील अॅड. खतीब यांना अंतरिम जामीन मिळालेला आहे तर इसराईल आणि हुजेब हे न्यायालयीन कोठडीत होते. 

यापूर्वी इसराईल याची पाच दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी तपासाधिकारी सपोनि अजय राजगुरू यांनी मुख्य आरोपी इसराईल शेख याची पुन्हा दोन दिवसांची वाढीव कोठडी मिळावी याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

फिर्यादीचे कपडे कोठे ठेवले याचा तपास करणे बाकी आहे, शिवाय तिचे शैक्षणिक कागदपत्रे जप्त करण्यासाठी आणि बाँड जप्त करण्यासाठी कोठडी मागितली. या अर्जावर सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला. त्याप्रमाणे आरोपी शेख यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी मान्य करण्यात आली आहे.

Web Title : जबरन धर्मांतरण: नाबालिग लड़की के मामले में अदालत ने बढ़ाई हिरासत

Web Summary : सोलापुर में, एक नाबालिग को जबरन धर्म परिवर्तन कराने और हमला करने के आरोपी व्यक्ति की पुलिस हिरासत दो दिन के लिए बढ़ा दी गई। यह विस्तार अधिकारियों को लड़की द्वारा हस्ताक्षरित खाली बॉन्ड पेपर जब्त करने की अनुमति देता है। मामले के संबंध में आरोपी, उसके सहायक और एक वकील सहित तीन लोगों को गिरफ्तार किया गया था।

Web Title : Forced Conversion: Court Extends Custody in Minor Girl's Case

Web Summary : In Solapur, a man accused of forcing a minor to convert and committing assault had his police custody extended by two days. This extension allows authorities to seize blank bond papers signed by the girl. Three individuals were arrested in connection with the case, including the accused, his aide, and a lawyer.