शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू बोरगाव येथील घटना: दोघांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 7, 2014 00:34 IST

अकलूज : बोरगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराने कंत्राटी कामगाराचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेस जबाबदार धरून वीज मंडळाच्या दोन कर्मचार्‍यांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

अकलूज : बोरगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराने कंत्राटी कामगाराचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेस जबाबदार धरून वीज मंडळाच्या दोन कर्मचार्‍यांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. महाळुंग येथील नागेश भीमराव जाधव हे राज्य वितरण मंडळाच्या अकलूज विभागात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास बोरगाव येथील रवींद्र पाटील यांच्या शेतात डीपी बदलीसाठी विजेच्या खांबावर चढले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे ते तारेला चिकटले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता येथील उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी ज्ञानेश्वर मुंडफणे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, डॉ. हरि›ंद्र सावंत-पाटील, संभाजी जाधव, अनिल जाधव, ॲड. दत्तात्रय मुंडफ णे, भीमराव रेडे, शामराव भोसले, शकुर डांगे आदी पदाधिकार्‍यांनी वीज मंडळाच्या मनमानी कारभाराचे पाढे वाचले. त्यानंतर मयताच्या कुटुंबास मदत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी १० हजार रुपयांची तातडीची मदतही दिली. (वार्ताहर)

----------------------------------------------ऑपरेटर, लाईनमनवर ठपकायावेळी नातेवाईकांनी नागेश जाधव याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने वीज मंडळाचे अकलूज विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, शाखा अभियंता पी. एम. शिंदे आदी अधिकार्‍यांनी मध्यस्थी करून जाधव याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून वीज ऑपरेटर प्रदीप बावणे व लाईनमन दिलीप घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले.