शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

आरएसएस, भाजपापेक्षा काँग्रेसच डेंजर : लक्ष्मण माने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 5:15 PM

काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी संविधानाचा खून केल्याच्या टीकेला वंचित बहुजन आघाडीचे उत्तर

ठळक मुद्देशिंदे यांचा  भ्रमनिरास झाल्याने ते काहीही बरळू लागले आहेत - मानेत्यांना स्वप्नातही वाटले नसेल की प्रकाश आंबेडकर सोलापुरात निवडणूक लढवतील - माने

सोलापूर : आरएसएस, भाजपापेक्षाकाँग्रेसच डेंजर आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केला. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण माने यांनी आमची लढाई काँग्रेसबरोबर असल्याचे सांगितले. 

काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी संविधानाचा खून केल्याच्या टीकेला उत्तर देताना माने म्हणाले की, शिंदे यांचा  भ्रमनिरास झाल्याने ते काहीही बरळू लागले आहेत. त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की प्रकाश आंबेडकर सोलापुरात निवडणूक लढवतील. आंबेडकर यांनी संविधानाचा खून केला म्हणजे नेमके काय केले हे शिंदे यांनी सांगावे. काँग्रेसच जातीयवादी असून, भाजपाची बी टीम आहे. काँग्रेसने गेल्या ७0 वर्षात  दुसºयांची लीडरशिप निर्माण होऊ दिली नाही. आता भाजपा व काँग्रेस आलटून पालटून सत्तेवर येत आहेत. आम्ही आरएसएस व भाजपाविरूद्ध युद्ध करतोय.

 पण शिंदे यांनी काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत. प्रकाश आंबेडकर यांना दहा हजार तरी मते पडतील काय असे सांगणारे शिंदे यांनीच आता स्वत:ला किती मते पडतील याचे गणित करत बसावे असा टोला लक्ष्मण माने यांनी लगावला. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस