शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

दिलासादायक बातमी; सोलापुरात कोरोनातून बरे होण्याचा दर ५४.६४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:38 AM

३६ टक्के रुग्णांवर उपचार; प्लाझ्मा थेरपी, अँटीजेन टेस्टचाही होणार लाभ

ठळक मुद्देसर्दी, खोकला घसा दुखणे असे त्रास झाल्यास त्वरित तपासणी करुन घ्यायला हवीकोरोनाने मृत झालेल्या ७२ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड आणि हृदयाचे विकार आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेऊन रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.

सोलापूर : शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ५४.६४ टक्के बाधित या आजारातून बरे झाले आहेत. तर साधारणपणे ३६ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळपास १० टक्के इतके आहे. तर या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार ७२७ इतके कोरोनाचे रुग्ण असून एक हजार ४९० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर २७३ जणांचा मृत्यू झाला. 

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आजाराचा पहिला रुग्ण हा १२ एप्रिल रोजी आढळला. त्यापूर्वी एक महिना आधी १२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये फीव्हर ओपीडी सुरु करण्यात आली. येथे २४ तास स्क्रीनिंग सुरु असून आत्तापर्यंत १७ हजार ७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. संशयितांना क्वारंटाईन, कोरोना आजार असलेल्यांना आयसोलेट करण्यात आले तर कोरोना आजार नसलेल्या नागरिकांना घरी पाठवले.

शहर व जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण सुरू असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे रॅपीड अँटीजन टेस्ट सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना आजाराचे रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येणे शक्य होईल.

पीएम केअर फंडातून नऊ व्हेंटिलेटरसिव्हिल रुग्णालयाला पीएम केअर फंडातून नऊ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. सिव्हिलकडे यापूर्वी १८ व्हेंटिलेटर होते, आता यात वाढ होऊन व्हेंटिलेटरची संख्या २७ होणार आहे. यामुळे अतिगंभीर रुग्णांचे अधिक चांगले उपचार करणे शक्य होईल. तंत्रज्ञामार्फत हे व्हेंटिलेटर रुग्णालयात बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रेमडीसीवीर, टोसिलोझुमॅब, फॅव्हीपीरॅवीर या नव्या औषधांचा वापर सिव्हिलमध्ये करण्यात येत आहे. तसेच प्लाझ्मा थेरपीची सुरुवात ही करण्यात आली असून यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढणार आहे.

रुग्ण बरा होण्याचा दर वाढवता येणे शक्य आहे. यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, फक्त गरजेच्या वेळीच घराबाहेर पडणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला घसा दुखणे असे त्रास झाल्यास त्वरित तपासणी करुन घ्यायला हवी. कोरोनाने मृत झालेल्या ७२ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड आणि हृदयाचे विकार होते. हे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेऊन रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.- डॉ. राजेश चौगुले, सहायक वैद्यकीय अधीक्षक, जनऔषध वैद्यकशास्त्र तज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल