शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

चला, निराशा झटकू यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 4:59 PM

जागतिक मानसिक आरोग्य दिन...

आजकाल आजूबाजूला घडणाºया घटना आणि समाज मनामध्ये होत जाणारे बदल, खूप निराश करून टाकतात. म्हणून सगळं संपलं आणि आपण विनाशाकडे जात आहोत असं म्हणून कसं चालेल? जगामध्ये एक टक्का जरी चांगुलपणा शिल्लक असला तरी सकारात्मकता जिवंत ठेवणे आवश्यक आहे. कुठून आणायची ही सकारात्मकता? ती विकत घेता येत नाही की, उसनीही आणता येत नाही. तर सकारात्मकता टिकवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काही करावे लागेल. जगात वाईट घडतेय म्हणून सतत वाईट जगासमोर आणतानाच, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे. आजकाल ‘माणुसकीच राहिली नाही, कोणावर विश्वास ठेवावा कळत नाही, काय होणार या पिढीचं’, हे आणि असली वाक्ये बोलण्यापेक्षा,आपणं प्रत्येकाने आपल्यापुरते बघूयात का? आला क्षण चांगला आणि सकारात्मक विचाराने घेऊया. खूप काही करण्यापेक्षा, सहज काय काय करता येऊ शकते याचा विचार करूया.

आयुष्यात अनेक भूमिकांमधून आपण जातो या भूमिकेशी प्रामाणिक राहून आपापली जबाबदारी पार पाडायला हवी. जर आपण विद्यार्थी आहोत, तर आपल्या स्वत:च्या आवडीनिवडी शोधताना स्वत:च्या क्षमता ओळखून त्यांना वाढवूया. लग्न केले आहे तर, जबाबदार पालक होऊया. उत्तम नागरिक आहोत तर शेजारपाजारांचे सहकारी होऊ या. व्यापारी आहोत तर उत्तम सेवा कशी देऊ शकेन यांचा विचार करूया. स्वत: जगूया आणि इतरांना जगण्यासाठी उत्साहित करुया. चुकणाºयाला सावध करूया, अडखळणाºयाला आधार देऊ या.मानसिक, आरोग्य समस्या कमी करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी  या गोष्टी पुरेशा नाहीत काय? मन  करा रे प्रसन्न ,सर्व सिद्धीचे कारण. मन मन म्हणजे तरी नेमकं काय? कुठे असते ते! आणि त्यावर संस्कार करायचे म्हणजे काय करायचे? त्यांचे काही प्रमाण, मोजमाप आहे का?

नाही. संस्कार असे मोजून मापून, ठरवून होत नसतात. व्यक्ती ते ग्रहण करत असतो, स्वत:च्या बुद्धी आणि क्षमतेनुसार! मन कमकुवत आहे म्हणजे काय ? मन कुठे असते ? या प्रश्नापासून सुरुवात केली तर मनाचा हा कमकुवतपणा एका दिवसात तयार झालेला नसतो. लहानपणापासून मुलांमध्ये बिंबवत गेलेल्या मानसिक स्थितीचे ते एक रूपांतर असते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगातील लोकसंख्येत दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करतात.

अकाली मरण केव्हाही त्रासदायकच. त्यातून आत्महत्येचे अपयशी झालेले प्रयत्न संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर त्रासदायक ठरतात. नको असणारे प्रश्न, पोलीस चौकशा आणि  काय काय!! आत्महत्या ही त्रासदायक गोष्ट आहे. करणाºयाला ही आणि त्याच्या कुटुंबीयांसाठीही!! 

१० आॅक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो आणि या वर्षीची थीम आहे, ‘मानसिक आरोग्याचे जतन व आत्महत्या प्रतिबंध’ आज समाजात टोकाची मानसिक अस्वस्थता दिसून येत आहे. या अस्वस्थतेमधून समस्या उत्पन्न होत आहेत. मानसिक, सामाजिक वर्तनामध्ये सुधारणा घडविण्यासाठी, संवाद आणि मार्गदर्शन गरजेचे आहे. मुलांचे मानसिक आरोग्य सुदृढ व सक्षम राहायला हवे यासाठी समुपदेशक महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘समुपदेशन म्हणजे समस्येवर साधलेला दोन्ही अंगाने होणारा संवाद!’ बºयाच गोष्टी संवादाने सुटू शकतात. तेव्हा बोलून,मत व्यक्त केले पाहिजे.

मनात येणारे नकारात्मक विचार झटकून ,सकारात्मक विचार केला पाहिजे. आपापसातील गैरसमज काढून टाकले पाहिजेत. बोलले पाहिजे. मत व्यक्त केलं पाहिजे. एवढं प्रत्येकाला करता आले पाहिजे. दहा आॅक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण प्रयत्नपूर्वक एवढे जरी करायला शिकलो तरी मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण वचनबद्ध झालो आहोत असे म्हणता येईल. ‘मेंटल हेल्थ प्रमोशन अ‍ॅन्ड सुसाइड प्रिव्हेंशन २०१९’ च्या या टॅग लाईनवर काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.- मृणालिनी मोरे(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व समुपदेशक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्यMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरEducationशिक्षण