शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी नसलेल्यांच्या नावे धनादेश

By admin | Updated: June 17, 2014 01:18 IST

सखोल चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात

सोलापूर: मोहोळ शौचालय घोटाळा प्रकरणाच्या वरवर चौकशीत आरोपी मोकाट सुटत असतानाच विस्तार अधिकाऱ्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. गावात रहिवासी नसलेल्या कुटुंबांच्या नावानेही प्रोत्साहन अनुदानाची रक्कम खर्च केली आहे.मोहोळ तालुक्यात मागील वर्षी भारत निर्माण योेजनेच्या शौचालय प्रोत्साहन अनुदान योजनेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाले होते. त्याची चौकशी जि. प. ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असून त्याचा अहवालही सीईओंना दिला आहे. त्यानुसारच पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी गैरप्रकार करणाऱ्यांवर ठोस अशी कागदपत्रे दिली नसल्याने आरोपींना जामीनही सहज मिळत आहे. परंतु सविस्तर चौकशीसाठी जि. प. ग्रामपंचायत विभागाने १० तालुक्यांचे विस्तार अधिकारी पंचायत व ९ विस्तार अधिकारी सांख्यिकींना नेमले आहे. त्यांना नेमून दिलेल्या लाभार्थ्यांच्या यादीनुसार प्रत्येक लाभार्थ्याच्या शौचालयाची तपासणी करावयाची आहे. देवडी गावातील ७६ लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान दिले आहे. त्यापैकी ४७ लाभार्थी त्या गावचे रहिवाशीच नाहीत. तपासणीसाठी गेलेल्या अमर दोडमणी या विस्तार अधिकाऱ्याला ४७ लाभार्थी गावचे रहिवासी नसल्याचे ग्रामसेवकाने कळविले आहे. एका कुटुंबाच्या घराला कुलूप आढळल्याने तपासणी करता आली नाही. लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदानाची ४ हजार ७०० रुपयांची रक्कम मिळाली आहे. मोहोळ शहरातील १०० लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान देण्यात आले आहे. विस्तार अधिकारी आर. एम. कमळे यांना २०-२५ शौचालयांची तपासणी करता आली. त्यापैकी ६ लाभार्थ्यांनी एकाच शौचालयापोटी डबल व अनेक वेळा अनुदान उचलले आहे. अनुदान उचललेल्या १५ लाभार्थ्यांनी शौचालयेच बांधली नाहीत.--------------------------------अहवालाला होतोय उशीरचौकशीसाठी नेमलेल्या १९ विस्तार अधिकाऱ्यांपैकी चार ते पाच अधिकाऱ्यांनी अहवाल ग्रामपंचायत विभागाला सादर केले आहेत. अन्य अधिकाऱ्यांची अद्यापही चौकशी सुरू आहे. चौकशीला गेल्यानंतर गावात ग्रामसेवक सापडत नसल्याचीही अडचण आहे. १२ जूनपर्यंत अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. -------------------------------लाभार्थ्यांची घरेच दाखवत नाहीतमोहोळ शहरातील शौचालयाची चौकशी करणे अडचणीचे होत आहे. पंचायत समिती किंवा मोहोळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी लाभार्थ्यांची घरे दाखविण्यास घाबरत आहेत. त्यामुळे चौकशी अधिकारी कमळे यांची अडचण झाली आहे.