जावयाचा सासर्‍यावर चाकूहल्ला

By Admin | Updated: May 19, 2014 00:24 IST2014-05-19T00:24:15+5:302014-05-19T00:24:15+5:30

वाटंबरे येथील घटना: सासूला मारहाण केल्याचा राग

Chakahala on her father-in-law | जावयाचा सासर्‍यावर चाकूहल्ला

जावयाचा सासर्‍यावर चाकूहल्ला

सांगोला : तू नेहमीच आमच्या सासूला दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण का करतो याचा राग मनात धरून जावयाने चाकूने केलेल्या हल्ल्यात सासरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वाटंबरे (ता. सांगोला) येथील माणनदीच्या पुलाजवळ शुक्रवारी रात्री १० वा. च्या सुमारास घडली. जगन्नाथ भगवान बचुटे (रा. संतपेठ, पंढरपूर) असे जखमी सासर्‍याचे नाव असून भास्कर राजाराम ताकमोगे (रा. शिरापूर, ता. मोहोळ) असे जावयाचे नाव आहे. जगन्नाथ यास दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीसमवेत सतत भांडणे होत असत. सततच्या भांडणामुळे जगन्नाथ बचुटे याची पत्नी नेहमी तिच्या मुलीकडे व माहेरी जात असे. शुक्रवार जावई भास्कर ताकमोगे व सासरा जगन्नाथ बचुटे दोघेजण दुचाकीवरुन मुलीस भेटून परत गावी आले होते. दरम्यान जावयाने तू दारू पिऊन सासूला शिवीगाळ, मारहाण का करतो याचा जाब विचारत चिडलेल्या जावयाने जगन्नाथ बचुटे यांचा गळा, छातीवर चाकूने सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: Chakahala on her father-in-law