सावधान; सोलापुरात गाडी घेऊन येताय... अशी' होणार मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 01:24 PM2021-02-27T13:24:26+5:302021-02-27T13:24:31+5:30

जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची होणार तपासणी; मास्क नसल्यास परवाना होणार निलंबित

Caution; Bringing a car to Solapur ... such a big action will take place | सावधान; सोलापुरात गाडी घेऊन येताय... अशी' होणार मोठी कारवाई

सावधान; सोलापुरात गाडी घेऊन येताय... अशी' होणार मोठी कारवाई

googlenewsNext

सोलापूर -  जिल्ह्यात प्रवेश करताना अथवा जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत. शहर- जिल्ह्यातील कोरोना वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी सुधारित आदेश जारी केले आहेत. 

दरम्यान, कारवाई करताना वाहनातील व्यक्‍तीकडे मास्क नसल्यास त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करावा, अशा सूचनाही आदेशातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. एकदा दंड भरुनही त्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे वाहन सात दिवसांसाठी जप्त केले जाणार आहे. तर वाहनचालकाचा परवानादेखील निलंबित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणाऱ्या पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे. तीनचाकी वाहनात तीन तर चारचाकीत चार (चालकासह) प्रवासी असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वाढीव प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड केला जाणार आहे.

या आदेशानुसार तत्काळ कार्यवाही सुरु करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, तीन व चारचाकी वाहनचालकांसाठी दंडाची रक्‍कम पाचशे रुपये असून दुसऱ्यांदा तसा प्रकार केल्यास एक हजारांचा दंड केला जाईल, असेही ओदशात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Caution; Bringing a car to Solapur ... such a big action will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.