शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... बार्शीत महिनाभरात तब्बल २६ जणांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सावकाराचे कर्ज, ...

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सावकाराचे कर्ज, दीर्घ आजार, व्यसनाधीनता ही याची प्रमुख कारणे आहेत. ग्रामीणमध्ये महिला तर शहरात युवकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

बार्शी शहर, तालुका, वैराग, पांगरी या चार पोलीस ठाण्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ११ आत्महत्येची नोंद ही बार्शी शहरात झाली आहे़ वैराग हद्दीत ७, पांगरीमध्ये ३ आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये ५ अशा एकूण २६ आत्महत्या झाल्या आहेत़ यामध्ये प्राधान्याने गळफास घेऊन, विषप्राशन करून व विहिरीत उडी मारून केलेल्या आत्महत्येचा समावेश आहे़ यातील ३ या आर्थिक अडचणींमुळे, २ दीर्घ आजाराला कंटाळून, पाच व्यसनाधीनतेमुळे व पाच आत्महत्या या सावकाराच्या कर्जाला कंटाळून झाल्या आहेत; मात्र त्याची तशी पोलीस स्टेशनला नोंद नाही़ उर्वरित आत्महत्या या घरगुती वादातून किंवा अज्ञात कारणाने झाल्या आहेत़ या २६ जणांमध्ये १० महिला तर १६ पुरुषांचा समावेश आहे़ यातील १० जण हे २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत.

बार्शी शहरात सोशल मीडियावर परिचित असलेल्या व युवक वर्गात लोकप्रिय असलेले मंगेश अशोक भाकरे, प्रशांत गायकवाड, रवींद्र पोपट गुंड, व्यापारी सूर्यकांत भोईटे, नवनाथ रोडे, नितीन कोरे या युवकांच्या आत्महत्येने सोशल मीडियात खूप चर्चा झाली़ बार्शीकर युवक सातत्याने का आत्महत्या करत आहेत यावर चिंता व्यक्त केली जााऊ लागली.

कोट ::::::

आजचा तरुण सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत गुरफटत चालला आहे़ त्याचा जवळच्या व्यक्तीशी असलेला संवाद हा कमी होत चालला आहे़ ज्यावेळी तो अडचणीत येतो तेव्हा त्याला मनमोकळे करण्यासाठी कोणीच नसते़ त्यामुळे युवकांनी या आभासी दुनियेतून बाहेर पडून आपला मित्र परिवार, कुुटुंब व नातलग यांच्याशी घट्ट नाते जोडावे. मन मोकळे करावे.

- विजय राऊत

अध्यक्ष, जय शिवराय प्रतिष्ठान