देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा सोलापूरजवळ अपघात; पाच ठार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 10:59 IST2026-01-18T10:58:38+5:302026-01-18T10:59:15+5:30
या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे...

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा सोलापूरजवळ अपघात; पाच ठार, एक जखमी
सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील मूळ हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास भरधाव कार झाडावर आढळून अपघात झाला. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मृत पाच लोक हे पनवेल येथील आहेत. ते अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ गावाजवळ असलेल्या देवडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. एमएच ४६ झेड ४५३६ या कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार झाडावर जाऊन आदळली. या गाडीत सहा जण होते, त्यात तीन पुरुष व तीन महिला होत्या. जखमी भाविकांवर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांची ओळख पटविण्याचे पोलीस काम करीत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मदत पुरवून आवश्यक कार्यवाही करण्यात आली. अपघाताचा परिणाम अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.