शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मोहोळमधील ब्रिटिशकालीन विहिरीचे झरे श्रमदानातून मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 17:10 IST

मोहोळ : शहरातील चाटी गल्ली परिसरात ब्रिटिश काळातील पिस्याची विहीर या नावाने परिचित असणाºया विहिरीतील गाळ श्रमदानातून काढण्यात आला ...

ठळक मुद्देचाटी गल्लीतील विहीर स्वच्छ झाली, त्याचे झरे मोकळे झाले या विहिरीतील पाणी यापुढे वापरता येणार चाटी गल्ली परिसरात जवळपास २ हजार नागरिक राहतात

मोहोळ : शहरातील चाटी गल्ली परिसरात ब्रिटिश काळातील पिस्याची विहीर या नावाने परिचित असणाºया विहिरीतील गाळ श्रमदानातून काढण्यात आला आहे़.

चाटी गल्ली परिसरात १०० फूट खोल व चौकोणी आकारात कोरीव दगडात बांधलेली ब्रिटिश काळातील एक विहीर आहे. या विहिरीवरच त्या काळात शहरातील बहुतांश नागरिक पाणी प्यायचे, परंतु गेल्या ३५ वर्षांपासून ही विहीर बंद अवस्थेत आहे़ त्यामुळे या विहिरीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा पडला आहे. गावच्या टोकावर असणारी ही विहीर पिसे नावाच्या मालकीची आहे़ त्यामुळे या विहिरीला पिस्याची विहीर या नावाने ओळखले जाते.

शहरात होणारी नेहमीची पाणी टंचाई लक्षात घेऊन चाटी गल्ली येथील आबालवृद्धांनी एकत्र येऊन रोज दोन तास विहिरीची स्वच्छता केली़ गाळ काढण्याची जणू मोहीमच राबविली़ आपला परिसर स्वच्छ ठेवणे, आपले कर्तव्य आहे याचे भान ठेवून भविष्यातील पाणी टंचाई व पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी भटकंती कोठेतरी थांबावी, या उद्देशाने विहीर स्वच्छतेचे कार्य करण्यात आले आहे़ ही विहीर स्वच्छ झाल्यावर गल्लीतील नागरिकांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे.

या सामाजिक उपक्रमात राहुल तावसकर, अमोल महामुनी, शेखर माने, मोहन पिलीवकर, संस्कार महामुनी, दादा गवळी, कुंडलिक चव्हाण, ज्ञानेश्वर गोटे, गणेश माळी, लक्षण कणसे, धनंजय गोटे यांच्यासह चाटी गल्लीतील तरुण परिश्रम घेत आहेत.

२००० जणांची तहान भागेल- चाटी गल्लीतील विहीर स्वच्छ झाली आहे़ त्याचे झरे मोकळे झाले आहेत. या विहिरीतील पाणी यापुढे वापरता येणार आहे़ या चाटी गल्ली परिसरात जवळपास २ हजार नागरिक राहतात़ उन्हाळ्यात टंचाई जाणवते़ आता यापुढे पाणी साठा वाढणार आहे. मूळ मालकाचे योगदान आणि सर्वसमानांच्या इच्छेतून या २ हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीकपातdroughtदुष्काळ