Breaking: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक; सोलापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 23:28 IST2021-06-30T20:32:53+5:302021-06-30T23:28:07+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक; सोलापुरातील घटना
सोलापूर - विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसाठी आले होते. सायंकाळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय कॉलनी, मड्डे वस्ती भागात बैठकीसाठी आले असता अज्ञात युवकाने त्याच्या गाडीवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पडळकर यांनी सकाळ सोलापुरातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार व रोहित पवार यांच्यावर पडळकर यांनी चांगलीच तोफ डागली होती.