Breaking; Pandharpur MLA Bharat Bhalke's health is critical; Treatment started in Pune | Breaking: पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू

Breaking: पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात सोशल मिडियावर सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू असून आमदार भारत भालके यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे. 

आमदार भारतनाना भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत जात असल्याचे समजते.

Web Title: Breaking; Pandharpur MLA Bharat Bhalke's health is critical; Treatment started in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.