Breaking; ना पाटील... ना कोकाटे... पुणे पदवीधरमधून अरुण लाड राष्ट्रवादीचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 09:06 IST2020-11-12T09:06:01+5:302020-11-12T09:06:40+5:30

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपच्या संग्राम देशमुखांविरुध्द देणार लढत

Breaking; No Patil ... No Kokate ... Arun Lad NCP candidate from Pune graduate | Breaking; ना पाटील... ना कोकाटे... पुणे पदवीधरमधून अरुण लाड राष्ट्रवादीचे उमेदवार

Breaking; ना पाटील... ना कोकाटे... पुणे पदवीधरमधून अरुण लाड राष्ट्रवादीचे उमेदवार

सोलापूर : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीच्या अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळी याबाबतची माहिती दिली. लाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 


पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपने या ठिकाणी सांगलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी बरीच रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. या जागेसाठी लाड यांच्यासह सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे इच्छूक होते. कोकाटे यांनी प्रचाराला सुरुवात केली तर पाटील यांनी उपमुख्ममंत्री अजित पवार यांच्याकडे ठाण मांडले होते. दुसरीकडे लाड समर्थकांनी उमेदवारी अरुण लाड यांनाच मिळेल असे दावे आठ दिवसांपूर्वीच केले होते. 


अरुण लाड यांनी मागील निवडणुकीत बंडखोरी केली होती. यामुळे राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांचा पराभव झाला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते.

Web Title: Breaking; No Patil ... No Kokate ... Arun Lad NCP candidate from Pune graduate