शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव  : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:39 IST

संविधान बचावासाठी लढा देणे म्हणजे एक दुसरं महायुद्धच होणार असल्याचेही मत काँग्रेसच्या अखिल भारतीय मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला होता अशा अफवा भाजपकडून पसरविल्या जात आहेत - नितीन राऊतभाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असतानाही केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले त्यांच्यासोबत आहेत - नितीन राऊत

सोलापूर : भारतीय संविधान बदलून देशात हुकूमशाही राजवट आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे काँग्रेसभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भारतात जात, धर्म आणि पंताच्या राजकारणाला थारा नाही पण भाजपकडून या लोकशाहीवर आधारित असलेल्या या देशाचे राजकारण जातीधर्मावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे संविधान बचावासाठी लढा देणे म्हणजे एक दुसरं महायुद्धच आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला होता अशा अफवा भाजपकडून पसरविल्या जात आहेत. त्यावेळी डॉ. बाबासाहेब हे काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीस उभे नव्हते तर ते स्वतंत्र पक्षाकडून उभे होते.

डाव्या विचारसरणीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेबांना दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभा आणि संविधान सभेवर घेतले. त्यावेळी पराभव झाला तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काँग्रेससोबत राहू, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती. संविधान बचावासाठी लढणारे लोकच डॉ. बाबासाहेबांचे खरे वारसदार आहेत. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असतानाही केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले त्यांच्यासोबत आहेत. ज्यावेळी त्यांना हे कारस्थान लक्षात येईल त्यावेळी तेही संविधान बचाव लढ्यासाठी उभे राहतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवले